
दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना याने खलनायकाची भूमिका साकरली. पण त्याचा भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे…. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा सुरु आहे.
अक्षय फार कमी मुलाखतींमध्ये दिसतो… पण काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लहानपणी घडलेला एक किस्सा सांगितला… जेव्हा अक्षय याच्या वडिलांना संन्यास स्वीकारलेला तेव्हाची ही गोष्ट आहे…
अभिनेते विनोद खन्ना यांनी सर्वकाही सोडून रजनीशपुरमला जाण्याचा निर्णय घेतला होता… संसाराचा त्याग करत अभिनेत्याच्या वडिलांनी संन्यास स्वीकारलेला. त्यानतंर अक्षय याने धर्माबद्दल स्वतःचे विचार व्यक्त केलेले.
अभिनेता म्हणालेला, 'मी कोणत्याच धर्मावर विश्वास ठेवत नाही… मी फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवतो,,,, मी कोणता तत्वज्ञानी नाही… आणि मी कोणत्या गोष्टीच्या शोधात नाही…', असं देखील अक्षय म्हणालेला.
सांगायचं झालं तर, यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी ओरेगॉनला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पत्नी आणि मुलांना देखील त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला. अक्षय आणि राहुल तेव्हा लहान होते…




Leave a Reply