• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत

December 20, 2025 by admin Leave a Comment


हाता-पायातील स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदनेसह गोळे ( क्रॅम्प ) येण्याचे प्रमाण आजकल वाढले आहे. बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार, एका ठिकाणी तासनतास बसून काम करणे, शरीराला जास्त आराम देणे यामुळे गोळे येण्याचे प्रमाण वाढ शकते. अनेकजण याला थकवा किंवा चालणे किंवा फिरणे कमी केल्याने होणारा त्रास समजून दुर्लक्ष करतात. परंतू वारंवार क्रॅम्प येणे ही समस्या होत असेल आणि खास करुन रात्रीच्या वेळी कोणतेही जास्त काम न करता जर हा त्रास होत असेल तर ही सामान्य समस्या नसते. त्यासाठी वेळीच आजार ओळखणे गरजेचे असते.

अनेक हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते वारंवार मसल्स क्रॅम्प येत असतील तर ही शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असू शकते. नसांचा त्रास आणि ब्लड सर्क्युलेशन संबंधीत गंभीर समस्या असू शकते. चला तर पाहूयात जर तुम्हाला ही वारंवार क्रॅम्प होत असतील तर खालील आजाराचे संकेत होऊ शकतील.

कॅल्शियम संबंधित असू शकतात आजार ?

कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक मिनरल आहेत. जे हाडे आणि दांतांना मजबूत ठेवण्यासोबत मासंपेशी आणि नसांचे काम योग्य करण्यात भूमिका निभावते. चुकीचा आहार, डेअरी प्रोडक्ट्स आणि हिरव्या भाज्यांची कमतरतेसह कोवळे ऊन्हाची कमतरता अनेकजण कॅल्शियमची कमीची शिकार होऊ शकते. याची कमतरता झाल्याने स्नायूत वारंवार क्रॅम्प्स हाडांमध्ये वेदना, कमजोरी आणि थकव्यां सारखी लक्षण दिसू शकतात.

इलेक्ट्रोलाइट इंबॅलन्स देखील मोठे कारण

शरीरात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडल्यानंतर स्नायू नीट काम करत नाहीत. जास्त घाम येणे, उल्टी-जुलाब, कमी पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त चहा -कॉफी पिल्याने संतुलन बिघडते. खास करुन मॅग्नेशियम, पॉटेशियमच्या कमतरतेने हातापायात क्रॅम्पची समस्या वाढते.

विटामिन डी आणि बी – 12 ची कमरता

विटामिन्स डी शरीरात कॅल्शियमच्या शोषणात मदत करते.याच्या कमतरतेने हाडे कमजोर होऊ लागतात. आणि स्नायूत वेदना आणि गोळे येण्याच्या तक्रारी वाढतात. तसेच विटामिन्स बी – 12 च्या कमतरतेने नसांना प्रभावित करते. ज्यामुळे हात किंवा पायात झिणझिण्या येणे, सुन्नपणा आणि मसल्स क्रॅम्प सारखी लक्षणे नजरेस येतात.

नसा आणि ब्लड सर्क्युलेशन संदर्भात त्रास

अनेकदा पायापर्यंत रक्त पोचवणाऱ्या नसांतील अडथळे आणि संकुचनामुळे चालणे- फिरणे, एक्सरसाईज दरम्यान मासंपेशीत वेदना आणि गोळे येतात. याशिवाय डायबिटीज संबंधित नर्व्ह समस्या वा माकड हाडांवरील दबावाची स्थिती वा वारंवार क्रॅम्प येऊ शकतात.

क्रॅम्पपासून आराम मिळण्यासाठी काय करावे ?

जर क्रॅम्पमुळे सोबत सातत्याने थकवा, हाडांमध्ये वेदना, हाता पायात मुंग्य वा झिणझिण्या येत असतील, नखे कमजोर होत असतील याकडे दुर्लक्ष करु नये. ही लक्षणे गंभीर कमतरता किंवा आजाराकडे इशारा करतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. तसेच क्रॅम्प आला तर त्या प्रभावित भागाला स्ट्रेच करावे. हलका मसाज करावा किंवा गरम पाण्याने शेकावे. याशिवाय डाएटमध्ये कॅल्शियम, विटामिन डी, प्रोटीन आणि इलेक्ट्रोलाईट भूरपूर असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश करावा. पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लांडग्यांची संख्या मोजायला गेले अन् सापडला 2 हजार वर्षांपूर्वीचा खजाना, सोलापूरच्या जंगलात नेमकं काय घडलं?
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 5 खेळाडू पहिल्यांदा खेळणार, तर गतविजेत्या संघातील 7 खेळाडूंचा पत्ता कापला
  • Local Body Elections : अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? दादांची भूमिका नेमकी काय? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरलं?
  • Local Body Elections : नांदेडमध्ये मतदारांना 3 तास डांबून ठेवलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या लोकांनी…
  • पलक तिवारी तर सौंदर्याची खाण…, पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीचे फोटो पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in