• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वादळी तुफानात स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची प्रतिकृती धाराशाही, आधी वाऱ्याने वाकला नंतर थेट जमीनदोस्त, व्हिडीओ व्हायरल

December 16, 2025 by admin Leave a Comment


ब्राझील येथे सोमवारी दुपारी आलेल्या जबरदस्त वादळाने स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंचीची रिप्लिका कोलमडून खाली कोसळल्याची घटना घडली आहे.स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची ही प्रतिकृती दक्षिण ब्राझीलच्या गुआयबा शहरातील हावन मेगास्टोर ( Havan Stores ) च्या बाहेर उभारली होती. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात वेगवान वाऱ्याने आधा हा पुतळा खाली झुकला आणि नंतर पूर्ण जमीनीवर कोसळला आहे.हा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे डोके तुटून विखुरले गेले. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

या स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या प्रतिकृतीचा पायासह उंची 40 मीटर (114 फूट) इतकी होती. हावन स्टोर्सने ब्राझीलमध्ये त्यांच्या दुकानांच्या फ्रेंचाईजमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. स्थानिक बातम्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तीचा केवळ वरचा भाग कोसळल्यानंतर क्षतिग्रस्त झाला आहे. त्याची उंची सुमारे 24 मीटर होती. 11 मीटरचा पेडस्टल अजूनही सुरक्षित आहे.

पुतळा कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल

या स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या प्रतिकृती एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की वेगाने वारे वाहू लागले तेव्हा मूर्ती हळूहळू पुढे झुकत गेली. आणि नंतर पार्किंग लॉटमध्ये जमीनीवर कोसळली. या दरम्यान परिसरात रस्त्यांवर वाहतूक सुरु होती. हावन स्टोर्सने दिलेल्या निवदेशनात सांगितले आहे की 2020 मध्ये हे स्टोर उघडल्यानंतर ही प्रतिकृती येथे स्थापित करण्यात आली होती. तिच्या स्थापनेची सर्व तांत्रिक सर्टीफिकेशन कंपनीकडे आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की ग्राहकांच्या आणि स्टाफच्या सुरक्षेसाठी हा परिसर लागलीच बंद करुन त्याला बॅरिकेट्स लावले असून पुतळा हटवण्यासाठी तज्ञ्जांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

Video footage shows a forty-meter-tall replica of the Statue of Liberty, located across from a McDonald’s within the parking lot of a Havan in the Brazilian city of Guaíba, one of several dozen replicas of the statue located throughout the country, collapsing during a wind and… pic.twitter.com/kUid9lwA3b

— OSINTdefender (@sentdefender) December 15, 2025

गुआयबाचे महापौर मार्सेलो मारानाटा यांनी सांगितले की या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. त्यांनी घटनास्थळी उचलेल्या पावलांचे कौतूक केले आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सोमवारी घटनेच्या प्रसंगी या भागात ताशी 90 किमी वेगाने वारे वहात होते. राज्यातील सिव्हील डिफेन्सने आधीच मेट्रोपॉलीटीन भागात हवामान खराब असेल याचा इशारा दिला होता. त्यात मोबाईल फोनवर पाठवलेल्या आपात्कालिन संदेशात स्थानिकांना सोसाट्याचा वारा आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Border 2 : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर लांब ठेवलं, पण ‘बॉर्डर 2’चा टीझर येताच सावत्र बहीण ईशा देओलने केली ही मोठी गोष्ट
  • म्हणायला मोठ्या माणसाची बायको, पण सुख कितीसं पदरात पडलं? शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!
  • Cameron Green : कॅमरुन ग्रीनला काल KKR ने 25.20 कोटीला विकत घेतलं आणि आज त्याच्याबाबत निराश करणारी बातमी
  • ‘धुरंधर’ स्टार अक्षय खन्नाच्या आईवडिलांचा घटस्फोट का झाला? चकीत करणारं कारण
  • शिवतीर्थ ते मातोश्री…घडामोडींना वेग, ठाकरे बंधूच्या युतीबाबत मोठी अपडेट समोर, एकाच दिवशी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in