
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, काहीही केल्याने वजन कमी होत नसल्याची अनेकांची ओरड असते. मात्र, तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर खालील टिप्स फॉलो करा.
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, तुम्ही काय खाता. खाण्यापिण्यावर सर्वकाही अवलंबून आहे. वजन कमी करायचे असेल तर दिवसातून दोनदाच जेवण करा.
दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान सेवन करा. सकाळी तुम्ही नाश्ता करू शकता. त्यामध्ये पोहे, उपमा, चिला, टिक्की अशा गोष्टींचा समावेश करा.
दुपारच्या जेवणात मिक्स पिठाची भाकरी, भाजी, दाल असे खा. शक्यतो सलाद जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. जेवणा अगोदर सलाद खा.
सायंकाळी सहा ते सातच्या आतमध्ये जेवण करा. त्यानंतर काहीच खाऊ नका. यादरम्यान हलके जेवण करण्यावर भर द्या. ओट्स, दलिया, खिचडी आणि सलाद खाऊ शकता.




Leave a Reply