• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वडील प्रसिद्ध मुख्यमंत्री, भाऊही राजकारणात, तरी हा बनला अभिनेता; खलनायक बनून चमकलं नशीब.. ओळखलं का त्याला ?

December 17, 2025 by admin Leave a Comment


राजकारण आणि चित्रपटसृष्टीचे जग अनेकदा वेगवेगळ्या मार्गांनी चालतं असं दिसतं, परंतु कधीकधी त्यांच्या संगमामुळे मनोरंजक आणि प्रेरणादायी कथा निर्माण होते. आज आपण अशा एका चेहऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे वडील देशातील सर्वात महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री होते, भाऊही राजकारणात स्थिरावले आणि त्याच्याही खांद्यावर त्याहूनही मोठ्या राजकीय वारशाचा दबाव होता. त्याला हवं असतं तर तोही सत्तेच्या जगात प्रवेश करू शकला असता, पण त्याने झगमगणारे दिवे आणि कॅमेरा यांचं जग निवडलं. या संपूर्ण प्रवासात, त्याच्या वडिलांचा एक जीवनमंत्र त्याची सर्वात मोठी ताकद बनला. वारंवार धडपडल्यानंतरही त्याच शब्दांनी त्याला धीर दिला आणि आज तो एक असा अभिनेता म्हणून ओळखला जातो जिथे त्याने स्वतःची वेगळी, खास ओळख निर्माण केली आहे. (Photos : @riteishd/Instagram)

चित्रपटसृष्टीतील लाडका अभिनेता रितेश देशमुखचा आज 46 वा वाढदिवस आहे. राजकीय कुटुंबातून आलेल्या रितेशचे वडील, दिवंगत विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदारी स्वीकरली होती, तर रितेशनचे दोन भाऊ अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे देखील राजकारणी आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा रितेशच्या राजकीय कारकिर्दीवर होत्या, पण त्याने अभिनयाची निवड केली.

आर्किटेक्चर शिकणाऱ्या रितेशला त्याच्या वडिलांकडून एक विशेष सल्ला मिळाला, जो त्याच्या यशाचे रहस्य आहे. रितेशचे वडील विलासराव देशमुख हे एक प्रमुख काँग्रेस नेते होते आणि त्यांनी दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पण रितेशने राजकारण न निवडता फिल्मी दुनियेची निवड केली. तो आर्किटेक्चरचा विद्यार्थी होता आणि त्याने मुंबईतील कमला रहेजा इन्स्टिट्यूटमधून पदवी मिळवली. नंतर त्याने न्यू यॉर्कमधील एका आर्किटेक्चर फर्ममध्ये काम केले. आजही तो स्वतःची डिझाईन फर्म, इव्होल्यूशन आर्किटेक्चरल डिझाइन स्टुडिओ चालवतो.

2003 साली आलेल्या 'तुझे मेरी कसम' मधून त्याने अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिसोजा होती, जी नंतर त्याची पत्नी बनला. सुरुवातीच्या चित्रपटांनंतर, रितेशला खरी ओळख विनोदी चित्रपटांमधून मिळाली. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'मस्ती' चित्रपटाने त्याला स्टार बनवलं.

नंतर त्याने 'क्या कूल हैं हम', 'ब्लफमास्टर', 'मालामाल वीकली', 'हे बेबी', 'धमाल', 'हाउसफुल', 'डबल धमाल', 'हाउसफुल 2', 'क्या सुपर कूल हैं हम', 'ग्रैंड मस्ती', 'हाउसफुल 3', 'टोटल धमाल', 'हाउसफुल 4', और 'रेड' असे अनेक हिट चित्रपट दिले,

रितेश त्याच्या अभिनयाच्या प्रत्येक चौकटीत अगदी फिट बसतो. विनोदी चित्रपटांमधील त्याच्या कॉमिक टायमिंगचे खूप कौतुक होतं. पण त्याचा अभिनय फक्त विनोदापुरता मर्यादित नाही. खलनायकाची भूमिका असो किंवा पडद्यावर रोमान्स करणं असो, प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करण्यात रितेश यशस्वी झाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अरे तान्या मित्तल खरोखरच श्रीमंत… घराच्या बाहेर गाड्यांची रांग, ते फोटो आली पुढे..
  • Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना आणखी एक मोठा दणका, आता हॉस्पिटलमधून थेट जेलमध्ये? अडचणी वाढल्या
  • Dhurandhar : धुरंधरच्या यशाने हैराण झालेले पाकिस्तानी निर्माते उत्तर देणार, घेतला मोठा निर्णय
  • गोड खाण्याची इच्छा होतेय पण आरोग्याची चिंता सतावतेय? ट्राय करा शुगर फ्री नारळाच्या लाडूची ‘ही’ खास रेसिपी
  • Sanjay Gaikwad : ठाकरेंची शिवसेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना… शिंदे सेनेच्या नेत्याचा हल्लाबोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in