• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लिबियासाठी पाकिस्तान ठरला साडेसाती, थेट लष्करप्रमुखासोबत तीन उच्च अधिकाऱ्यांचा मृत्यू, जग हादरलं..

December 24, 2025 by admin Leave a Comment


जगात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी लिबियामध्ये पाऊल ठेवताच त्या देशाला एक अत्यंत मोठा झटका बसला. लिबियासाठी पाकिस्तान साडेसाती ठरला आहे. पाकिस्तानसोबत संरक्षण करार केल्यानंतर लिबियावर मोठं संकट आले. थेट लिबियाचे लष्करप्रमुखांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांच्यासह 7 जण अपघातात मरण पावले. पाकिस्तानचा मित्र देश तुर्कीतून लिबियाला येत असताना ही घटना घडली. लिबियाचे लष्करप्रमुख आणि इतर चार अधिकारी एका खाजगी विमानातून तुर्कीहून आपल्या देशात येत होते. मात्र, तुर्कीवरून उड्डाण भरल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या विमानाची मोठा अपघात झाला. या विमान अपघाताबद्दल कळताच लबियाहून तपास करणारी टीम तुर्कीमध्ये पोहोचली. हा अपघात नेमका कसा झाला हे तुर्कीने सांगितले. मात्र, संशय अधिक वाढलाय.

तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथून लिबियाच्या लष्करप्रमुखांच्या विमानाने उड्डाण केली. लष्करप्रमुख, इतर चार अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हे विमान अचानक कोसळले. या अपघातानंतर एकही व्यक्ती या विमानातील वाचू शकली नाही. सर्वांचा मृत्यू झाला. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. तुर्की आणि लिबिया यांच्यातील लष्करी सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने उच्च-स्तरीय संरक्षण चर्चेसाठी लिबियन शिष्टमंडळ अंकारा येथे आले होते.

तुर्कीसोबत झालेल्या चर्चेनंतर शिष्टमंडळ परत आपल्या देशात निघाले होते. लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद दबेबाह यांनी लष्करप्रमुख जनरल मुहम्मद अली अहमद अल हद्दाद आणि चार उच्च अधिकाऱ्यांच्या अपघाती निधनाबद्दल पुष्टी केली आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक निवेदनही जारी केले आहे. हा अत्यंत दु:ख अपघात आहे. लिबियाची टीम तुर्कीमध्ये पोहोचली असून संपूर्ण तपास केला जात आहे. हा खरोखरच अपघात की घातपात याचा शोध घेतला जातोय.

लिबियाच्या पंतप्रधानांनी म्हटले की, लिबियाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फाल्कन 50 प्रकारच्या बिझनेस जेटचा मलबा अंकारापासून 70 किलोमीटर दक्षिणेस हायमाना जिल्ह्यातील केसिक्कावाक गावाजवळ सापडला आहे. अपघातानंतर बोलताना तुर्कीच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी म्हटले, अंकाराच्या एसेनबोगा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लिबियाला परतणाऱ्या त्या विमानाशी त्यांचा संपर्क तुटला होता. काहीतरी तांत्रिक समस्या त्या विमानात होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Year Ender 2025 : पिक्चरपेक्षा वादाचीच चर्चा, 2025 मध्ये या चित्रपटांवरून झाला गदारोळ
  • या देशात डेटिंग, लग्न आणि मुलं जन्माला घातल्यावर मिळतात लाखो रुपये, कारण आश्चर्यकारक
  • लिबियासाठी पाकिस्तान ठरला साडेसाती, थेट लष्करप्रमुखासोबत तीन उच्च अधिकाऱ्यांचा मृत्यू, जग हादरलं..
  • Urfi Javed : नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने मध्यरात्री 3.30 वाजता उर्फीसोबत असं काय केलं? जाणून थरकाप उडेल…
  • IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंड वनडे आणि टी 20I सीरिजसाठी टीम जाहीर, माजी कर्णधार खेळणार नाही, कारण..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in