
अनेकांना जेवणात लिंबू लागते. लिंबू खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. फक्त जेवणातच नाही तर लिंबू पाणीही पिले जाते. लिंबात सर्वात जास्त व्हिटामिन सी असते.
व्हिटामिन सीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे लिंबू आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. फक्त लिंबूच नाही तर लिंबाचे सालही फायदेशीर ठरतात.
लिंबाचे साल अत्यंत गुणकारी ठरतात. तज्ञांच्या मते, लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. त्यात विविध प्रकारचे फायबर देखील असते.
म्हणूनच लिंबाची साल कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा एक समृद्ध स्रोत आहे. लिंबाची साल आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
विशेष म्हणजे पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण लिंबाच्या सालीचे पावडर तयार करूनही चेहऱ्यावर लावू शकता. ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.




Leave a Reply