
”बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आज सिनेमा प्रदर्शित झाला आहे… सिनेमात रिंकू मुख्य भूमिकेत आहे.
सध्या रिंकू हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रिंकू एक विवाहितेच्या भूमिकेत दिसत आहे. चाहत्यांना देखील रिंकूचा लूक आवडला आहे…
पिवळी काठपदराची साडी… लाल टिकली… मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या घालून रिंकू हिने हटके फोटो शूट केलं आहे. रिंकू हिच्या 'आशा' सिनेमातील हा लूक आहे. फोटो पोस्ट करत रिंकू हिने मालती & निलेश –आशा… असं कॅप्शन लिहिलं आहे.
कॅप्शनमध्ये रिंकू पुढे म्हणाली, '“आशा” चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच खान्देशातील आई कानबाई या मंगलमय उत्सवाचा अनुभव घेता आला…' तिच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. सिनेमात रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात.




Leave a Reply