• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्न लावून फसवणूक करीत लुटमार करणाऱ्या टोळीची तोडफोड, नवरदेवाच्या बापाचेही केले अपहरण

December 15, 2025 by admin Leave a Comment


लग्न लावून देत घरातील सोनं- नाणं लुटून नवरीसह रफुचक्कर होण्याच्या बेतात ही टोळी होती. परंतू त्यांचे बिंग फुटल्याने या टोळीने नवरदेवाच्या आणि त्याच्या मामाच्या घरात सशस्र धुडगुस घातला. घरातील साहित्याची तोडफोड केलीच शिवाय नवरदेवाच्या बापाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये उघडकीस आला आहे. या टोळीने रस्त्यात एका वाहनाला अडवून लुटमार केल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरणात वाशिम पोलिसांनी नववधूसह पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात एकूण १३ आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील एका तरुणाचे लग्न जमत नसल्याने लग्न जमवून देणाऱ्या एका एजंटने एक स्थळ आणले. या तरुणाचे नाशिकच्या मुली सोबत लग्न जुळवून दिले होते. 11 डिसेंबरला यांचा विवाह एका मंदिरात पार पडला. लग्नाच्या दोन दिवसाने मुलीच्या माहेरच्या दोन व्यक्ती मुलीला नेण्यासाठी आसेगाव पेण येथे आले. मात्र, या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची त्यांनी विचारपूस करताच त्या दोघांनी तिथून पोबारा केला.

 नवरदेवाच्या घरातील साहित्याची तोडफोड

आपल्या टोळीचा पर्दाफाश होईल या भीतीने ही टोळीने रात्रीच्या सुमारास तीन गाड्यांमधून सशस्त्रांसह नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिथे पोहोचून नवऱ्याची विचारपूस केली. मात्र नवरदेव तेथे आढळून आला नाही , त्यामुळे या टोळक्याने नवरदेवाच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. हे तोडफोड परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांनाही या टोळीने धमकी दिली. त्यानंतर या टोळक्याने नववधूच्या शोधात नवरदेवाच्या मामाचे घर असलेल्या वाशिम तालुक्यातील मोहजा येथे वळवला आणि तिथे पोहोचून त्यांच्या घरातील साहित्याची आणि दुचाकींची नासधूस केली. तिथेही नववधू सापडत नसल्याने या टोळक्याने थेट नवरदेवाच्या वडिलांना आसेगाव, पेण येथून उचलून गाडीत टाकले आणि तिथून पोबारा केला.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राहुल दिलीप मस्के ( वय 32 वर्ष- रा. नागेवाडी जि. जालना ) आणि सतीश विनायक जाधव (वय 29 वर्ष- रा. जालना ) यांना अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले आहे. तर आकाश छगन गायकवाड याला जालना येथून तर नवरी मुलगी आणि एक एजंट शांताराम कडूजी खराटे ( रा.मोहजा ) यांना सुद्धा ताब्यात घेतले आहे. वाशिम पोलिसांनी इतर आरोपींना पकडण्यासाठी  3 पथके रवाना केली आहेत अशी माहिती पोलिस अक्षिक्षक अनुज तारे यांनी यांनी दिली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Municipal Election: मित्रपक्षाला विचारतो कोण? भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, महापालिकेसाठी स्वबळाची तयारी?
  • Silver ETF Investment : चांदी खरेदी करू शकत नसाल तर सिल्व्हर ईटीएफ घ्या, गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या
  • Dhurandhar: लग्न न करताच 2 मुले, ‘धुरंधर’मधील अभिनेत्याने 6 वर्षे डेट केल्यानंतर केला साखरपुडा
  • जेवताना ही एक चूक करताय? पैसे आणि आरोग्य दोन्ही जाईल हातातून
  • मुंबईतून 2 दहशतवाद्यांना अटक, दहशतवादाविरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in