• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्न झालं, स्वस्तातील हनीमून डेस्टिनेशन हवंय? डोंगर, फ्रेश हवा आणि बीचेज सर्व काही बजेटमध्ये; फक्त नीट वाचा…

December 12, 2025 by admin Leave a Comment


लग्न ठरलं की ते अनेकांना घाई झालेली असते लग्नाच्या दिवसाची. नीट लग्न होतंय ना आणि कधी नवीन आयुष्याला सुरुवात करतोय असं नवजोडप्याला वाटत असतं. लग्न झाल्यानंतर मग मात्र अनेकांना फिराय़ला, हनीमूनला जाण्याची घाई असते. जोडीदारासोबत कुठे तरी दूरवर जावं असं त्यांना वाटतं. पण मनासारख्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर पैशाची अडचण समोर येते. पण आता तुम्ही काळजी करू नका. अगदी डोंगराच्या कुशीत, फ्रेश हवेच्या ठिकाणी आणि समुद्र किनारी तुमच्या बजेटमध्येच तुम्हाला हनीमून डेस्टिनेशन मिळणार आहे. एका क्लिकवर वाचा. तुम्हाला सर्व काही मनासारखं वाचायला मिळेल. आणि हो, तुमच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये ही बातमी शेअर करायला विसरू नका.

जैसलमेर

हनीमूनसाठी जैसलमेर हे एक परफेक्ट ठिकाण आहे. या अप्रतिम ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसह शांत आणि आनंदी क्षण घालवू शकता. जैसलमेरचे किल्ले, जुन्या हवेल्या, वाळवंट आणि थार वाळवंटाचे नजारे तुमच्या मनात कायमचे घर करून जातील. फ्लाइट आणि ट्रेनने जैसलमेरला सहज पोहोचता येते आणि येथे खर्चही तुलनेने कमी येतो.

कुर्ग

कर्नाटकचे कुर्ग हे भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. कुर्गची हिरवाई, शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ही जागा प्रसिद्ध आहे. दाट कॉफीच्या बागायती, धबधबे आणि नद्यांचे नजारे मनाला भुरळ घालतात. ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी येथे फिरण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. कपल्स एबी फॉल्स आणि इरुप्पु फॉल्ससारख्या धबधब्यांचा आनंद घेऊ शकतात. तसेच ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंगसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे तुमची ट्रिप आणखी खास होऊ शकते.

ऊटी

शांत वातावरण आणि स्वच्छ हवा अनुभवण्यासाठी तुम्ही तमिळनाडूमधील ऊटीला भेट देऊ शकता. पार्टनरसह रोमँटिक ट्रिपसाठी ही जागा उत्तमच आहे. वर्षभर या ठिकाणचं हवामान साधारणतः थंड राहते आणि डोंगरांची हिरवाई मानसिक शांतता देते. तुम्ही साउथमध्ये राहत असाल तर या ठिकाणी जाण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही.

लक्षद्वीप

कमी बजेटमध्ये बीचचा आनंद घ्यायचा असल्यास लक्षद्वीप उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. येथे कपल्स कठमठ, मिनीकॉय, कवरत्ती, बंगाराम, कल्पेनी आणि अगाती या बेटांना भेट देऊ शकतात. तसेच येथील समुद्रकिनाऱ्यावर पार्टनरसह कॅन्डल लाईट डिनरचा आनंदही घेता येतो.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Akshaye Khanna : दे दो ऑस्कर… अक्षयचा ‘धुरंधर’ परफॉर्मन्स पाहून भाजप नेत्याचीही मागणी
  • हे आहे जगातील सर्वात जास्त महागडं फळ, किंमत ऐकून घाम फुटेल, एका लक्झरी कारपेक्षाही जास्त किंमत
  • Chanakya Niti : आनंदी आयुष्यासाठी पती-पत्नीने रोज ही गोष्ट केलीच पाहिजे, चाणक्य काय म्हणतात?
  • Squash World Cup: 29 वर्षात भारताने पहिल्यांदाच मिळवलं जेतेपद, या खेळाडूंमुळे झालं शक्य
  • CIA चे हिमालयातील ते गुप्त मिशन, 60 वर्षानंतरही भारतासाठी का आहे धोकादायक ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in