• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नातच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याच्या नव्या दाव्याने खळबळ!

November 28, 2025 by admin Leave a Comment


Palash Muchhal And Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. त्यासाठी सांगलीत जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळेच स्मृती मानधनाने आपले लग्न पुढे ढकलले. त्यानंतर स्मृती मानधनाने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ हटवले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छल स्मृतीला अंधारात ठेवून एका मुलीशी चॅटिंग करत होता, असा दावा केला जातोय. तसे काही स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. असे असतानाच आता बॉलिवूडमधील एका चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. त्याच्या या दाव्याची सध्या सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा होत आहे.

व्हायरल स्क्रीनशॉट प्रकरण काय आहे?

स्मृती मानधनाने आपले लग्न पुढे ढकलले आहे. हे लग्न आता नेमके कधी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पलाश किंवा स्मृती यांच्याकडून त्यांच्या लग्नाची दुसरी तारीख अद्यापही सांगितलेली नाही. सध्यातरी स्मृती मानधना आपल्या वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहे. स्मृतीने लग्न पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर काही कथित स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये पलाश मेरी डिकॉस्टा नावाच्या एका तरुणीशी कथितपणे चॅटिंग करत असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे तो मेरीला भेटायलाही बोलवत असल्याचे चॅटिंगमध्ये दिसते आहे. याच व्हायरल स्क्रीनशॉटचा आणि कथित चॅटिंगचा आधार घेत पलाशने स्मृती मानधनाचा विश्वासघात केला आहे, असा दावा केला जातोय. त्यानंतर आता वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटले आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्याने नेमका काय दावा केलाय?

पलाश आणि स्मृती यांचे लग्न पुढे ढकललेले असताना तसेच पलाशच्या कथित चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल झालेले असताना बॉलिवूडमधील अभिनेता, निर्माता म्हणून ओळख असलेल्या केआरके म्हणजेच कमाल आर खान याने खळबळजनक दावे केले आहेत. कमाल आर खान हा नेहमीच वेगेगळी आणि वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रदि्द आहे. त्याने याआधी केलेल्या काही दाव्यांमुळे त्याच्यावर सडकून टीका करण्यात आलेली आहे. आता याच केआरकेने पलाश मुच्छलविषयी काही दावे केले आहेत. ‘लग्नाचा सोहळा सुरू असताना स्मृती मानधनाने पलाश मुच्छलला एका कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडले’ असा दावा केआरके याने केला आहे. तसेच पलाशला स्मृती मानधनाशी फक्त प्रसिद्धीसाठी लग्न करायचे होते, असेही केआरकेने म्हटले आहे.

Reports are out. #smiritiMandhana caught #PalaashMuchal red handed with a choreographer girl during marriage function. Saala Kamaal Ka Topibaaz Aadmi Hai. Means he was marrying with #Mandhana for publicity only.

— KRK (@kamaalrkhan) November 25, 2025

दरम्यान, पलाश खरंच स्मृतीला अंधारात टेवून एका तरुणीशी चॅटिंग करत होता का? याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. तसेच सध्या व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटच्या सत्यतेबाबतही स्पष्टता नाही. पालशनेही यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ राशींच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये, नियम जाणून घ्या
  • CM Fadnavis: फडणवीस यांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले, जास्तीत जास्त…
  • Thackeray Brothers Alliance : मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती जाहीर होणार?
  • Dhurandhar : FA9LA गाण्यावर अक्षय खन्नाची एण्ट्री गाजली, ‘खोश फसलाह’ तुम्हीही गाऊ शकता, इतके सोपे आहेत लिरिक्स
  • Chanakya Neeti : या 3 गोष्टी आहेत आयुष्यातील सर्व अडचणींचं कारण, आयुष्यभर करावा लागेल पश्चताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in