
only a quarter of a day: दारु यकृतासाठी घातक मानली जाते. तरीही अनेक जण दारु सोडत नाहीत. दारु पिण्यासाठी बहाण्यांची कमी आहे का? तुम्ही सांगा बरं. कधी आनंदाचे कारण तर कधी दु:खाचे निमित्त, बसले आपले प्यायला. इंदुरमधील एका लिव्हर स्पेशालिस्टकडे एक व्यक्ती पोहचला. त्याने तो दररोज किती दिवस दारु पितो याची माहिती दिली, त्यामुळे डॉक्टर हैराण झाला आहे. डॉक्टर विनीत गौतम यांचा रुग्णासोबत चर्चेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ जवळपास 1.3 कोटी लोकांनी पाहिला आहे. डॉक्टरांनी दारु पिण्याची सुरक्षित अशी मर्यादा नसते आणि एका आठवड्यात किती किती दारु प्यायची याविषयीची माहिती दिली आहे.
मग दिवसाला किती दारू ढोसावी?
Video मध्ये डॉक्टरचा संवाद आहे. रोज एक क्वॉर्टर पिता? रोज एक क्वार्टर हे काय कमी आहे का, रोज दारु पिणे तेही एक क्वार्टर, हा दारुचा अति डोस आहे, 190 एमएलचा. एका आठवड्यात तुम्ही किती दारु पिता हे तुम्हाला माहिती आहे का? एका आठवड्यात 240 एमएल दारुची मर्यादा पाळावी. पण ते काही आरोग्यसाठी चांगले नाही. दारु ही आरोग्यासाठी घातकच आहे. पूर्ण आठवड्यात केवळ एक क्वॉर्टर अल्कोहल घेतली तर यकृताला कमी नुकसान होईल. जर तुम्ही रोज एक क्वॉर्टर घेतली तर त्याचा अर्थ तुम्ही सहा पट दारु अधिक पितो. त्यामुळे रोज इतकी दारु पिणे आरोग्यासाठी घातक असल्याचे डॉक्टर या रुग्णाला सांगत आहे.
View this post on Instagram
दारुने लिव्हर पंक्चर
तुम्ही गेल्या 10-12 दिवसात दारुच घेतली नाही का, असा सवाल हे डॉक्टर त्या रुग्णाला विचरतात. त्यावर तो नाही असे उत्तर देतो. तुम्ही एकदम दारु कशी सोडली, काही त्रास झाला नाही का, असा सवाल त्यावर डॉक्टर विचारतात. खूप त्रास झाला, पण दारू सोडायची ठरवली. लिव्हर पार पंक्चर झाले आहे. यकृत त्रास देत आहे असे रुग्ण सांगतो. त्यावर काही शारिरीक तपासण्यासाठी डॉक्टर सुचवतो. डॉक्टरांनी याविषयीचे काही व्हिडिओज पोस्ट केले आहे. त्यात अनेक लोकांचे यकृत 90 टक्के खराब झाल्याचे त्यात सांगण्यात आले.
यकृतावर काय होतो परिणाम?
दारु पिल्याने चरबी वाढते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होतो. अल्कोहल हॅपेटायटिसचा आजार बळावतो. जर अधिक दारु प्यायलास आणि आजार बळवला तर लिव्हर सिरोसिस होतो. अधिक गंभीर आजार झाल्यास हळूहळू यकृत खराब होते. त्यामुळे दारु सोडणे हाच यावरचा चांगला उपाय आहे.
Leave a Reply