• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्यात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जारी

December 1, 2025 by admin Leave a Comment


राज्यातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या काही प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. आता राज्यातील एकूण किती नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींना स्थगिती देण्यात आली आहे, आणि त्यासाठी कधी मतदान होणार आहे, या संदर्भातील सुधारीत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार राज्यातील एकूण  24 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आणि 154 सदस्यपदांसाठी आता येत्या वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांसंदर्भात 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या 24 अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या 154 सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यापासून सुधारित कार्यक्रमानुसार राबविली जाणार आहे, त्यासाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. उर्वरित अन्य सर्व ठिकाणी नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025 होती; परंतु 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर अपिलांवर निर्णय आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप 11 डिसेंबर 2025 रोजी होईल. 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होतील. तर मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.

अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे : ठाणे- अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा. पुणे- बारामती व फुरसुंगी- उरुळी देवाची. सोलापूर- अनगर व मंगळवेढा. सातारा- महाबळेश्वर व फलटण. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री. नांदेड- मुखेड व धर्माबाद. लातूर- निलंगा व रेणापूर. हिंगोली- बसमत. अमरावती- अनंजनगाव सूर्जी. अकोला- बाळापूर. यवतमाळ- यवतमाळ. वाशीम- वाशीम. बुलढाणा- देऊळगावराजा. वर्धा- देवळी. चंद्रपूर- घुग्घूस.

सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांचा तपशील : अमरावती: अचलपूर-2, दर्यापूर-1, धारणी-2 व वरूड-1. अहिल्यानगर: जामखेड-2, राहुरी-1, शिर्डी-1, शेवगाव-3, श्रीगोंदा-1, श्रीरामपूर-1 व संगमनेर-3. कोल्हापूर: गडहिंग्लज-1. गडचिरोली: आरमोरी-1 व गडचिरोली-3. गोंदिया: गोंदिया-3 व तिरोडा-1. चंद्रपूर: गडचांदूर-1, बल्लारपूर-1, मूल-1 व वरोरा-1. छत्रपती संभाजीनगर: गंगापूर-2, पैठण-4 व वैजापूर-2. जळगाव: अंमळनेर-1, पाचोरा-2, भुसावळ-3, यावल-1, वरणगाव-2 व सावदा-3. जालना: भोकरदन-2. ठाणे: बदलापूर-6. धाराशिव: उमरगा-3 व धाराशिव-3. नांदेड: कुंडलवाडी-1, भोकर-1 व लोहा-1. नागपूर: कामठी-3, कोंढाळी-2, नरखेड-3 व रामटेक-1. नाशिक: ओझर-2, चांदवड-1 व सिन्नर-4. परभणी: जिंतूर-1 व पुर्णा-2. पालघर: पालघर-1 व वाडा-1. पुणे: तळेगाव-6, दौंड-1, लोणावळा-2 व सासवड-1. बीड: अंबेजोगाई-4, किल्ले धारूर-1 व परळी-5. बुलढाणा: खामगाव-4, जळगाव जामोद-3 व शेगाव-2. भंडारा: भंडारा-2. यवतमाळ: दिग्रस-3, पांढरकवडा-2 व वणी-1. रत्नागिरी: रत्नागिरी-2. लातूर: उद्‌गीर-3. वर्धा: पुलगाव-2, वर्धा-2 व हिंगणघाट-3. वाशीम: रिसोड-2. सांगली: शिराळा-1. सातारा: कराड-1 व मलकापूर-2. सोलापूर: पंढरपूर-2, बार्शी-1, मैंदर्गी-1, मोहोळ-2 व सांगोला-2 आणि हिंगोली: हिंगोली-2.

 

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • International Migrant Day: कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त आपली भूमी सोडून जातात? जाणून घ्या
  • IND vs SA : अहमदाबादमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट
  • प्रसिद्ध अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा केला वाढदिवस
  • सौदी अरेबियाने पाकिस्तानला दाखवली लायकी, 50 हजार भिकाऱ्यांना मायदेशी हाकलले
  • IND vs SA T20I : पाचवा-निर्णायक सामना अहमदाबादमध्ये, किती वाजता सुरुवात होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in