
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याकरिता मध्यस्थी करत आहेत. सुरूवातीला हे युद्ध त्यांनीच भडकून दिले होते. रशियाने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, आम्ही फक्त युक्रेनसोबतच नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. आता नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले की, मला वाटते की, युद्ध थांबण्याकरिता पूर्वीपेक्षा आपण खूप जास्त जवळ आहोत. झेलेन्स्की यांच्यासोबत जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स आणि नाटो देशांनी अत्यंत चांगली चर्चा केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर चर्चा केली. युद्ध संपवण्याकरिता ही चर्चा करण्यात आली.
अमेरिकेने रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याकरिता रशिया आणि युक्रेनला एक प्रस्ताव दिला. मात्र, त्या प्रस्तावाला विरोध युक्रेनने केला. रशियाने तो युद्ध बंदीचा करार मान्य केला होता. यादरम्यान अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील संबंध तणावात आले होते. झेलेन्स्की यांनी थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली. डोनाल्ड ट्रम्प देखील थेट झेलेन्स्की यांच्यावर टीका करताना दिसले. रशियासोबतचे युद्ध संपल्यानंतर झेलेन्स्की यांना जेलमध्ये जावावे लागू शकते, असेही त्यांनी म्हटले होते.
युरोपीय नेत्यांनी शांतता कराराची अंमलबजावणी करण्यासाठी एक बहुराष्ट्रीय दल तैनात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने दिलेल्या सुरक्षा हमीचा हा एक भाग असेल. अमेरिका युक्रेनला नाटोच्या कलम 5 नुसार, सुरक्षेची हमी देऊ शकतो. त्याचा थेट अर्थ असा होतो की, युक्रेनवर हल्ला म्हणजे सर्व नाटो देशांवर समजला जाईल. दुसरीकडे अमेरिकेकडून रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारतावरही रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिकेचा दबाव आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी अमेरिकेला थेट धक्का दिला. आता ज्याप्रकारे अमेरिकेकडून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत, त्यावरून स्पष्ट आहे की, हे युद्ध थांबवले जाऊ शकते. रशिया देखील अमेरिकेसोबत चर्चा करत आहे. पुतिन काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेले होते.
Leave a Reply