• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रक्षा खडसे ते गुलाबराव पाटील, बोरनारे ते पटेल… या दिग्गजांना गावगाड्यात धक्का; नगरपरिषदेचे धक्कादायक निकाल काय ?

December 21, 2025 by admin Leave a Comment


राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीत फक्त काँग्रेसलाच दोन अंकी संख्या ओलांडता आली आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. कुणाची बहीण निवडणुकीत उभी होती, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाची भावजय तर कुणाचा जवळचा कार्यकर्ता. त्यामुळे प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्याने या निवडणुकीत स्वत: लक्ष घातलं होतं. प्रचारात जीवाचं रान केलं होतं. यात काहींना यश आलं. तर काहींच्या पदरी निराशा आली आहे. या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंपासून ते राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. तर प्रफुल्ल पटेल यांनाही होम पिचवर मोठा धक्का बसला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव हा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्यातच त्यांना धक्का बसला आहे. महाविकास आघाडी प्रणित धरणगाव शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. लिलाबाई चौधरी यांना 2417 मते मिळाली. या निवडणुकीत चौधरी यांनी महायुती प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या वैशाली भावे यांचा पराभव केला आहे. हा पराभव गुलाबराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पटेलांना होमपीचवर धक्का

गोंदीया नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. पटेल यांना त्यांच्या होमपीचवरच धक्का बसला आहे. गोंदियात राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी नासरे चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. तर काँग्रेसचे सचिन शेंडे आघाडीवर आहेत.

आमदार बोरनारेंचा भाऊ हारला

छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रमेश बोरनारे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव झाला आहे. वैजापूरमध्ये संजय बोरनारे यांची भाजपचे दिनेश परदेशी यांच्याशी लढत होती. यात परदेशी विजयी झाले आहेत. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

रक्षा खडसेंची जादू नाहीच

जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना होम पिचवर मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा विजय झाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा 2561 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत रक्षा खडसे या भाजपचं नेतृत्व करत होत्या. त्यांना मतदारांनी नाकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये अजितदादांना धक्का

बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कायम राहिलं आहे. पंकजा मुंडे यांनी व्यवस्थित प्लानिंग केल्याने अजितदादा गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागणार आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, धारूरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर‌ आहेत. परळीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र लढत आहेत. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आघाडीवर आहेत.पंकजा मुंडे यांनी नव्या, जुन्यांना एकत्र करून ही निवडणूक आखली होती. त्यांची ही रणनीती यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमच्या घरात आहे नकारात्मक ऊर्जा? ‘हे’ 2 उपाय करा लगेल कळेल
  • Maharashtra Local Body Election 2025: ठाकरे गटाचा भाजपाला सर्वात मोठा धक्का, मंत्री महाजन यांच्याच जिल्ह्यातून हादरवणार निकाल!
  • पप्पा तुम्ही घाणेरडे काम करता… त्या भूमिकांमुळे अभिनेत्याच्या मुलीने वडिलांना सुनावले
  • AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, मालिकाही जिंकली, इंग्लंडचं 11 दिवसांत काम तमाम
  • Maharashtra Local Body Election : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले; कुणाला मिळालं वर्चस्व?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in