
आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत, त्यांचे जेवण पापड खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. जेवणात पापड लागतो म्हणजे लागतोच. पापड खाल्ल्याशिवाय जेवणाला चव लागत नाही.
आपल्याकडे विविध डाळींपासून पापड तयार केली जातात. फक्त पापड खाण्यापेक्षा मसाला पापड खाणे अधिक फायदेशीर ठरते. त्यावर कांदा, टोमॅटो आणि काकडी टाकली जाते.
मसाला पापड खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. यामुळे ज्यांना साखरेची समस्या आहे, अशा लोकांनी दररोजच्या आहारात मसाला पापड खावा.
मसाला पापड खूप पातळ असतो आणि त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप कमी आहे म्हणून तो फायदेशीर ठरतो. दुपारचे जेवण असो किंवा संध्याकाळचे आपण पापड खाऊ शकता.
विशेष म्हणजे टोमॅटो, कांदा आणि काकडी एकाच वेळी शरीरात जाते, त्यामुळे पापड खाणे फायदेशीर आहे. लहानमुलेही पापड आरामात खाऊ शकतात.




Leave a Reply