• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युवराज सिंगने भर मैदानात गौतम गंभीरची मान आवळली, हजारो चाहत्यांसमोर नेमकं काय घडलं?

December 11, 2025 by admin Leave a Comment


टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने अनेक चढउतार पाहिले. भारताची कसोटीतील स्थिती एकदम खालावल्याचं दिसून आलं. तर वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. आता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दृष्टीने गौतम गंभीरची कसोटी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने विजयी सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या सामन्यातही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. हा सामना न्यू चंदीगड स्टेडियममध्ये होत असून युवराज सिंगनेही हजेरी लावली आहे. या निमित्ताने वनडे वर्ल्डकप आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी गौतम गंभीर आणि युवराज सिंग जोडी पुन्हा एकत्र दिसली. युवराज सिंग त्याच्या आनंदी मूडमध्ये होता.

युवराज सिंगने थेट गौतम गंभीरची मान आपल्या डाव्या हाताने बगळेत घेऊन मस्करीत आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघंही आनंदी मूडमध्ये होते आणि त्यांच्यात खेळीमेळीचं वातावरण होतं. गौतम गंभीर युवराज सिंगला शरण गेल्याचं दिसून आलं. तसेच स्वत:ला त्याच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युवराज सिंग त्याचे शिष्य अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलसोबत दिसला. दोघांनीही युवराजशी हस्तांदोलन केले आणि युवराजने त्यांच्याशी चर्चा केली.

Yuvraj Singh having fun with Gautam Gambhir. ♥🇮🇳

– Two Heroes of Indian cricket. pic.twitter.com/TyGYOzEXhw

— Tanuj (@ImTanujSingh) December 11, 2025

न्यू चंदीगड स्टेडियममध्ये एका स्टँडला युवराज सिंगचे नाव देण्यात आले आहे. यावेळी वुमन्स वर्ल्डकप विजेत्या कर्णधार हरमनप्रीत कौरचाही सन्मान करण्यात आला. सामन्यापूर्वी गौतम गंभीरने युवराज सिंगला टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. युवराज सिंगचं भारतीय क्रिकेटमधील योगदान अमूल्य आहे. कर्करोगाशी झुंज देत असताना त्याने वनडे वर्ल्डकप विजयात मोलाची साथ दिली. इतकंच काय तर कँसरशी यशस्वी झुंज दिल्यानंतर मैदानात परतला आणि क्रिकेटही खेळला. युवराजने भारतासाठी 304 वनडे सामन्यांमध्ये 8701 धावा केल्या, त्यात 14 शतके केली. त्याने कसोटी सामन्यांमध्ये 1900 धावाही केल्या असून तीन शतके समाविष्ट आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Akshye Khanna : जणू एखादा शिकारी शांतपणे ठेवतोय शिकारीवर नजर… अक्षय खन्ना ते रेहमान डकैत… कसं झालं ट्रान्स्फॉर्मेशन ? ‘त्या’ लूकची गोष्ट
  • भारतात हिंदू जास्त गरीब कि मुसलमान ? आश्चर्यकारक आकडेवारी समोर
  • महिलांमध्ये मोठ्या संख्येने वाढणारा ‘हा’ आजार बरा होऊ शकतो का? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
  • Ind vs Pak : PM मोदी की शरीफ, कोणाला मिळतो जास्त पगार?
  • टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत पहिल्यांदाच नको ते घडलं, एका षटकात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in