
रशिया आणि युक्रेनमधील स्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामध्येच युक्रेनने मोठा हल्ला रशियाच्या लष्कराच्या जनरलवर केला. हा हल्ला इतका जास्त भीषण होता की, ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव यांच्या चेहऱ्याची हडेही तुटली गेली. या हल्ल्याने जगात खळबळ उडाली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. हेच नाही तर रशिया युक्रेन युद्धासाठी दोन शांतता प्रस्तावही देण्यात आली आहेत. अमेरिकेने दिलेल्या पहिल्या शांतता प्रस्तावाला रशियाने हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र, त्याला जोरदार विरोध युक्रेनकडून करण्यात आला. युक्रेन यादरम्यानच रशियाच्या मुख्य लोकांना टार्गेट करून गुप्त हल्ले करत असल्याचे दिसत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा अनेक देशांना बसताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आरोप केला जात आहे की, रशिया या युद्धात इतरही देशाच्या नागरिकांना उतरवत आहे. याबद्दल भारताने स्पष्ट भूमिका घेतली असून भारतीयांनी या युद्धाच्या दूर राहावे, असे सांगितले. त्यामध्येच आता रशियात शिक्षणासाठी गेलेल्या गुजरातमधील साहिल मोहम्मद हुसेन या विद्यार्थ्याने सरकारकडे विनंती करणारा व्हिडिओ पाठवला, साहिलच्या या व्हिडीओमुळे भारतात खळबळ माजली. हा विद्यार्थी रशियात शिक्षणासाठी भारतातून गेला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना मदतीसाठी त्याने थेट आवाहन केले आहे. ‘पंतप्रधान मोदी, प्लीज मला वाचवा’ अस व्हिडिओत त्याने म्हटले. रशियन सैन्यात भरती झाल्यास ड्रग्ज प्रकरणातून मुक्त केले जाईल असे साहिलला सांगण्यात आले होते. रशियातील पोलिसांनी खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून तुरूंगात पाठवल्याचे साहिलने व्हिडिओत म्हटले आहे.
भारतीय विद्यार्थ्याचा धक्कादायक व्हिडीओ, थेट रशिया युक्रेन युद्धात.. pic.twitter.com/je2A9FA8xS
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2025
साहिलने व्हिडीओमध्ये स्पष्टपणे म्हटले की, मागच्या वर्षी मी रशियात शिक्षणासाठी गेलो होतो, रशियात आर्थिक व व्हिसाशी संबंधित अडचण आल्याने मी काही रशियन लोकांसोबत संबंध साधला. हे रशियन लोक ड्रग्जची तस्करी करायचे. रशियन पोलिसांनी एका खोट्या ड्रग्ज प्रकरणात मला अटक केली व सात वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. रशियन सैन्यात भरती झाल्यास ही शिक्षा माफ होईल असे मला सांगण्यात आले. शिक्षा माफ होईल या आशेने मी रशियन सैन्यात भरती झालो. मात्र, 15 दिवसांच्या सैन्य प्रशिक्षणानंतर मला थेट रशिया-युक्रेन युद्धात पाठवण्यात आले. साहिलने त्यानंतर युक्रेनच्या सैनिकांसमोर शरणागती पत्करली.
Leave a Reply