• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या बलाढ्या देशात मुस्लिमांवर मोठं संकट, छळामुळे पळून गेलेल्यांना शोधून-शोधून पुन्हा आणलं जातय देशात, अन् थेट..

December 27, 2025 by admin Leave a Comment


चीनमध्ये जवळपास सव्वा दोन कोटींच्या आसपास मुस्लिम समाजाचं वास्तव्य आहे. यातील जवळपास सर्वच उइगर मुस्लिम आहेत. चीनमध्ये सरकारची सेन्सरशिप असल्यामुळे देशात सध्या किती मुस्लिम लोक राहतात याचा अधिकृत आकडा कोणाकडेही उपलब्ध नाही, मात्र चीनमध्ये सव्वा दोन कोटींपेक्षाही अधिक मुस्लिम असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उइगर मुस्लिमांचा चीनमध्ये छळ सुरू आहे. त्यातच आता चीनमधील मुस्लिमांच्या संकटात आणखी वाढ झाली आहे. ज्या मुस्लिम लोकांनी चीनी सरकारकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून देशातून पलायन केलं आहे, त्या मुस्लिम लोकांना पुन्हा चीनमध्ये पाठवण्यासाठी चीनकडून आता इतर देशांवर दबाव निर्माण केला जात आहेत, जे छोटे-छोटे देश आहेत, ते चीनच्या या दबावाला बळी पडत असून, उइगर मुस्लिमांची पुन्हा एकदा रवानगी चीनमध्ये करण्यात येत आहे.

चीनमध्ये मुस्लिम समाजाला त्यांच्या धार्मिक परंपरेचं पालन करण्याचं स्वातंत्र्य नाहीये, मशि‍दीची डिझाईन कशी असावी? स्ट्रक्चर कसं असावं याचा निर्णय देखील येथील सरकार घेत आहे. शिनजियांगमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांवर तर अनेक प्रतिबंध घालण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना चीनी संस्कृती शिकवण्यासाठी चीनेने 2017 ते 2019 या दोन वर्षांमध्ये तब्बल दहा लाख मुस्लिमांची रवानगी ही डिटेंशन कॅम्पमध्ये केली आहे. यातील अनेक मुस्लिम धर्माच्या लोकांनी या कॅम्पमधून पलायन केलं, ते दुसऱ्या देशांमध्ये पळून गेले.

मात्र चीनने इथे देखील त्यांची पाठ सोडली नाही, चीनमधून इतर देशांमध्ये आश्रयासाठी गेलेल्या सर्व मुस्लिम समाजाच्या लोकांना पुन्हा चीनमध्ये पाठावं, यासाठी चीनने आता या देशांवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यातील काही देशांनी तर चीनच्या दबावाला बळी पडून पुन्हा एकदा या मुस्लिम लोकांची रवानगी चीनमध्ये केली आहे. तर चीनने काही मुस्लिम समाजाच्या नागरिकांची जेलमध्ये देखील रवानगी केली आहे. दरम्यान या मुस्लिम समाजाच्या लोकांना आता चीनमध्ये पुन्हा एकदा आणण्याचं काम चीनकडून सुरू आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चांदीच्या कड्याचे आहेत फायदेच फायदे, अस्थिर मन होईल शांत, कोणते ग्रह होतात मजबूत?
  • Loan EMI Trap : कर्जाचा विळखा घेऊ शकतो तुमचा जीव, EMI चा ट्रॅप कसा ओळखायचा? कसं बाहेर यायचं?
  • Akshaye Khanna : त्याच्या डोक्यात हवा गेली आहे.. ‘दृश्यम 3’ मधून अक्षयची ऐनवेळी माघार, मेकर्सचा संताप
  • फ्रिजमध्ये ‘या’ 9 वस्तू चुकूनही ठेऊ नका, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक
  • ठाकरे गट शरद पवारांना जबर धक्का देण्याच्या तयारीत, लवकरच…3 प्लॅन समोर आल्याने खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in