
घर म्हणजे केवळ विटा आणि दगडांच्या भिंतींची रचलेलं घर नाही तर ते एक मंदिर आहे. वास्तुशास्त्रात घराला खूप खास महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले आहे की घर हे आनंद, शांती आणि समृद्धीचे केंद्र आहे. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असणे महत्त्वाचे मानले जाते. कारण सकारात्मक घराचे वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते आणि केवळ सकारात्मक ऊर्जाच सकारात्मक वातावरण राखू शकते.
तथापि कधीकधी आपल्याकडून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे घरात अशा गोष्टी ठेवल्या जातात ज्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या घराच्या सकारात्मकतेवर होतो. या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात, जी हळूहळू सकारात्मक उर्जेला वाळवीसारखी खाऊन टाकते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असताना, मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि परस्पर संघर्ष वाढतात. तर घरात नकारात्मकतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींचा कोणत्या आहेत ज्या घराबाहेर काढल्या पाहिजे ते जाणून घेऊयात.
या गोष्टी घरात ठेवू नका
तुटलेली भांडी
वास्तुशास्त्रानुसार तुटलेली भांडी कधीही घरात ठेवू नयेत आणि ती रोजच्या वापरात चुकूनही वापरू नयेत. वास्तुनूसार तुटलेली भांडी घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या वस्तू नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानल्या जातात. यामुळे घरात संघर्ष आणि आर्थिक नुकसान वाढते, म्हणून तुटलेली भांडी ताबडतोब घराबाहेर काढावीत.
नकारात्मक फोटो
आपल्यापैकी अनेकांना घरात वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो लावायला आवडतात. पण घरात कधीही चुकूनही रडणे, युद्ध, हिंसाचार किंवा दुःख दर्शविणारी फोटो लावू नका. अशा प्रतिमा मानसिक ताण वाढवतात.
निरुपयोगी वस्तू
घराची दररोज स्वच्छता करावी. शिवाय महिन्यातून एकदा तरी घर पूर्णपणे स्वच्छ करावे. या स्वच्छता दरम्यान वापरात नसलेल्या वस्तू टाकून द्या. वापरात नसलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात.
तुटलेले घड्याळ
घड्याळ हे काळाचे आणि जीवनाच्या गतीचे प्रतीक आहे. घरात बंद पडलेलं किंवा तुटलेले घड्याळ हे थांबलेली प्रगती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे, म्हणून असे म्हटले जाते की तुटलेले घड्याळ ताबडतोब दुरुस्त करावे किंवा फेकून द्यावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply