• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना कोर्टाचा थेट दणका, अखेर संतोष देशमुख प्रकरणात..

December 23, 2025 by admin Leave a Comment


अशोक काळकुटे बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. हत्येचे काही फोटो व्हायरल झाली. संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी फरार असून इतर सर्व आरोपी जेलमध्ये आहेत. संतोष देशमुखच्या हत्येनंतर राज्यभर जनआक्रोश मोर्चे काढण्यात आली. यादरम्यान बीडमधील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना दिसली. बीडमधील परिस्थिती तणावात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्याने थेट धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालय परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ॲड. बाळासाहेब कोल्हे उपस्थित यावेळी होते. सर्व आरोपींना VC द्वारे हजर करण्यात आले होते. आरोपींचे वकील यावेळी उपस्थित होते. सुनावणीदरम्यान आरोपींवरील ड्राफ्ट कोर्टाने वाचून दाखवला.

वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे. सुनावणीनंतर बोलताना ॲड.उज्वल निकम यांनी म्हटले की, अखेर न्यायालयाने आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. आजही आरोपीच्या वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फॉर डीरेल केले गेले. खटल्यात विलंब लावणे व खटला उलथवून टाकण्याचा प्रयत्न आहे.

प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच ती कारणे न्यायालयात मांडली जात होती त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. आरोप निश्चित करण्यात किती वेळ लागला हे पाहिले. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात असो किंवा कोणत्याही कोर्टात असो प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे ॲड.उज्वल निकम यांनी म्हटले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Patanjali : पतंजली फूड्सचे शेअर्स 4 दिवसांपासून तेजीत, गुंतवणूकदारांनी कमावले 3900 कोटी रुपये
  • Rahul Gandhi: राहुल गांधी 100 टक्के पंतप्रधान होणार…पण अमित शाह…कोणी केलं धक्कादायक राजकीय भाकीत?
  • Bigg Boss Marathi 6: गौतमी पाटील नाही तर ही नृत्यांगना दिसणार बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये?
  • दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जोरदार निदर्शने, लोक आक्रमक, बांगलादेशातील परिस्थितीत..
  • ख्रिसमसच्या दिवशी बनवा बिना रम आणि अंड्यांशिवाय प्लम केक, जाणून घ्या सोपी रेसिपी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in