• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणा -कोणाला संधी?

December 28, 2025 by admin Leave a Comment


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटानं महापालिका निवडणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये एकूण 36 उमेदवारांचा समावेश आहे.  यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची आघाडी रिंगणात असणार आहे. तर अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता असून, अजित पवार गटाकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोणाला संधी?

आपल्या पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनीष दुबे, सीील पिटर डिसोझा, अहमद खान, बबन मदने, सुभाष पाताडे, सचिन तांबे, सज्जू मलिक, शोभा रत्नाकर जाधव, हरिश्चंद्र जंगम, अक्षय पवार, ज्योती सदावर्ते, रचना गवस, भाग्यश्री केदारे, सोमू पवार, अब्दुल शीद मलिक, चंदन धोंडीराम पाटेकर, दिशा मोरे, सबिया मर्चेट, विलास घुले, अजय विचारे, हदिया कुरेशी, ममता ठाकूर, युसुफ मेमन, अमित पाटील, धनंजय पिसाळ, प्रतीक्षा घुगे, नागरत्न बनकर, चांदणी श्रीवास्तव, दिलीप पाटील, अंकिता दुबे, लक्ष्मण गायकवाड, सईदा खान, बुशरा मलिक, वासंथी मुरुगेष देवेंद्र, किरण रविंद्र शिंदे आणि फरीन इम्तियाझ खान यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे आज राष्ट्रवादी शरद पवार गटानं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेल्यानं यातील अनेक इच्छुकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे, त्यातील काही जाणांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवरड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढवणार आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी ! जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच अचानक शिवसेनेच्या बड्या नेत्याची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
  • ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 तासात 80 ड्रोन हल्ले, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानानेच भारताचा पराक्रम सांगितला; नवी माहिती समोर!
  • ई-सिगारेट ओढायची, थेट डोळेच गेले, महिलेसोबत भयंकर घडलं; डॉक्टरांच्या इशाऱ्याने चिंता वाढली!
  • वंचित-काँग्रेस यांच्यात ऐतिहासिक युती, मुंबई पालिका निवडणुकीचं गणित बदलणार; नेमकं काय होणार?
  • मराठी अभिनेत्रीला दीड कोटींची खंडणी घेताना पकडलं रंगेहाथ; बिल्डरकडून गुन्हा दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in