
भारतीय लष्करात आता मोठे बदल होणार आहेत. सोशल मीडियाच्या वापराबद्दल हे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंस्टाग्रामवर आता भारतीय सैनिक आणि अधिकारी कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर करू शकणार नाहीत. त्यांना इंस्टाग्राम वापरण्याची परवानगी देण्यात आली पण एखादी पोस्ट लाईक करणे किंवा त्यावर कमेंट करण्यावरही मनाई आहे. सैनिक फक्त इंस्टाग्रामचा वापर पोस्ट बघण्यासाठी आणि सध्याची माहिती घेण्यासाठी करू शकतात. सध्याच्या डिजिटलच्या युगात हे इंस्टाग्रामबद्दलचे नियम जारी करण्यात आले असून युनिट आणि विभागांना याबद्दलची माहिती जारी करण्यात आली. इंस्टाग्रामवरील माहिती फक्त सैनिक बघू शकतात. जर काही चुकीच्या गोष्टी भारतीय सैन्याबद्दल पसरवल्या जात असतील किंवा काही व्हिडीओ वगैरे व्हायरल होत असतील तर सैनिक आपल्या वरिष्ठांना देखील याबद्दलची माहिती देऊ शकतात.
भारतीय सैन्याने फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम वापराबद्दल यापूर्वीच काही नियम जारी केले. सुरक्षा कारणामुळे त्यावर निर्बंध देखील लादले होते. हनी ट्रॅपमध्ये अडकून काही सैनिकांनी देशाची संवेदनशील माहिती लीक केली होती. यामुळेच आता भारतीय लष्कराकडून सोशल मीडियावर नियंत्रण ठेवले जात आहे. भारतीय सेना प्रमुख जनरल उपेंद्र व्दिवेदी यांनी लष्करी कर्मचारीनी सोशल मीडियावर कसा हाताळावा थेट हेच सांगितले.
सोशल मीडिया हे एक मोठे आव्हान आहे. जेव्हा तरूण NDA मध्ये येतात. त्यावेळी सर्वात अगोदर ते रूमममध्ये त्यांचा मोबाईल शोधतात. त्यांना फोनशिवाय जगण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात. हा पण हे देखील तेवढेच खरे आहे की, स्मार्टफोन आवश्यक आहे. आम्ही सैनिकांना कधीच स्मार्टफोन वापण्यावर बंदी घालू शकत नाहीत. ते बाहेर असतात, अशावेळी मुलांची शाळेची फीस भरणे, आई वडिलांच्या तब्येतीची माहिती आणि पत्नीसोबत बोलण्यासाठी स्मार्टफोन लागतोच.
त्यांनी यादरम्यान स्पष्ट म्हटले की, रिएक्ट करने आणि रिस्पॉन्ड करणे यात खूप मोठा फरक आहे. रिएक्ट करणे म्हणजे लगेचच उत्तर देणे आहे. रिस्पॉन्ड करणे म्हणजे विचार करून उत्तर देणे. आम्हाला अजिबात वाटत नाही की, आमचे सैनिक कोणत्या मुद्द्यात अडकावेत. त्यामुळेच त्यांना एक्ससारखा सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म बघण्याचीच फक्त परवानगी आहे, बाकी नाही.
Leave a Reply