
Blue Eyes: निळ्याशार डोळ्यांची मुल-मुली मन वेधून घेतात. हे निळे डोळे अनोख्या सौंदर्याचे जणू प्रतिकच आहेत. इंडोनेशियातील निळ्या डोळ्यांचा हा आदिवासी समूह अत्यंत विरळ मानल्या जातो. या देशात मोठी लोकसंख्या आहे. पण येथील बहुतांश लोकांचे डोळे हे काळ्या रंगाचे पण या स्थानिक आदिवासी समाजातील पुरुष आणि महिलांचे डोळे निळेशार आहेत.
या निळ्या रंगांमुळे ते अत्यंत आकर्षक दिसतात. मुली, तरुणी आणि महिलांचेच नाही तर पुरुषाचे सौंदर्य खुलते. या निळ्या डोळ्यांनी तेव्हा ते एखाद्याकडे एकटक पाहतात. तेव्हा काळजी चोरल्याचा भास होतो. पण हे चमकते निळे डोळे (Shining Blue Eyes) या लोकांसाठी अभिशाप आहे. कारण एक दुर्लभ आजार वॉर्डनबर्ग सिंड्रोममुळे (Waardenburg Syndrome) त्यांचे डोळे असे निळेशार झाले आहेत.
असं मानल्या जातं की 42,000 लोकांमध्ये एखाद्यामध्ये असे डोळे दिसतात. वॉर्डनबर्ग सिंड्रोममुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. तर काही विशिष्ट रंग ओळखण्याची क्षमता सुद्धा हरवते. या सिंड्रोममुळे एक डोळा काळा तर दुसरा निळ्या रंगाचा असू शकतो. हा दुर्लभ आजार येथील आदिवासींमध्ये दिसून येतो.
तर येथील आदिवासींमध्ये जणुकीय रचनेतून (genes) सुद्धा निळे डोळे असणाऱ्यांची संख्या कमी नाही. जणुकीय बदलांचा परिणाम आईच्या पोटातील भ्रुणावर होतो आणि या मुलांचे डोळे निळे दिसतात. एकाच जातीय समूहात अशी डोळ्यांची मोठ्या संख्या असल्याने हा प्रकार ही दुर्लभ मानल्या जातो.
इंडोनेशियातील भूवैज्ञानिक आणि प्रसिद्ध फोटोग्राफ कोरचनोई पसारीबू याने बुटन या आदिवासी जमातीमधील काही सदस्यांचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर जगातील तज्ज्ञांनी या आदिवासींचा अभ्यास केला. तेव्हा अनेक बाबी संशोधनातून समोर आल्या. या समूहातील अनेकांची डोळे निळेशार आहेत.
बुटन बेट हे इंडोनेशियातील सुलावेसी प्रदेशात आहे. या जमातीतील अनेक लोकांमध्ये हा सिंड्रोम दिसून आला आहे. तर काहींमध्ये जणुकीय बदलातून डोळे निळे झाल्याची उदाहरणं मिळाली आहेत. या लोकांची निळे डोळे अत्यंत चमकदार असल्याचे दिसून येते.





Leave a Reply