
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून ती वाईट ते अतिवाईट श्रेणीत पोहोचली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १७२ मोजला गेला असून, इतर भागांमध्येही तो अधिक आहे. मरीन ड्राईव्ह आणि मलबार हिल परिसरात दिसणारे धुक्यासारखे वातावरण प्रत्यक्षात प्रदूषणाचेच द्योतक आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाची टक्केवारी वाढतच असून, न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेसह इतर यंत्रणांना वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेने बांधकाम साईट्सवर AQI मोजण्यासाठी यंत्रे लावली असून, प्रदूषण रोखण्यासाठी सूचनाही दिल्या आहेत.
Leave a Reply