• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मासे खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, गाठावे लागेल थेट हॉस्पिटल

December 15, 2025 by admin Leave a Comment


मासे हा शब्द ऐकताच अनेक खवय्यांच्या तोंडाला आपोआप पाणी सुटते. चमचमीत तळलेले मासे असो किंवा झणझणीत फिश करी असो, मासे हे केवळ चविष्ट नसतात, तर ओमेगा-३ आणि प्रथिनांचा खजिना असल्याने ते आरोग्यासाठीही सुपरफूड मानले जातात.

fish eating habits (1)

पण मासे खाताना तुम्ही त्याच्या सोबत काय खाता, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. काही खाद्यपदार्थांसोबत मासे खाल्ल्याने तुमच्या शरीरात विषारी प्रतिक्रिया निर्माण होतात. ज्यामुळे माशांमधील पोषक तत्त्वे शोषून घेण्याऐवजी पचनात गडबड करतात आणि तुम्हाला थेट हॉस्पिटल गाठावे लागू शकते.

fish eating habits (1)

मासे खाताना कधीही दही, दूध, ताक किंवा चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थ खाऊ नये. कारण मासे आणि दुग्धजन्य पदार्थ या दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. दोन्हीतील काही संयुगे एकत्र आल्यास पचनक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. यामुळे पोटदुखी, अस्वस्थता, गॅस आणि पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

fish eating habits (2)

व्हिटॅमिन सी युक्त असलेले लिंबू किंवा इतर लिंबूवर्गीय फळे माशांसोबत जास्त प्रमाणात खाणे टाळावे. व्हिटॅमिन सी आणि मासे एकत्र आल्यास विषबाधा होण्याचा किंवा पचनाचा गंभीर त्रास होण्याचा धोका असतो. चवीसाठी थोडे लिंबू चालते, पण जास्त खाऊ नका.

fish eating habits (2)

पालक आणि कोथिंबीर यांसारख्या काही विशिष्ट हिरव्या भाज्या माशांसोबत जास्त प्रमाणात खाऊ नयेत. या भाज्या जास्त खाल्ल्यास माशांमधील कॅल्शियम शरीर व्यवस्थित शोषून घेऊ शकत नाही. यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होते.

fish eating habits (3)

मासे खाल्ल्यानंतर लगेच गोड पदार्थ किंवा मिठाई खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीरातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

fish eating habits (4)

जर तुम्हाला मासे किंवा फिश करीसोबत अल्कोहोल किंवा वाईन पिण्याची सवय असेल, तर ती लगेच थांबवणे तुमच्या हिताचे आहे. यामुळे यकृतावर (Liver) खूप जास्त ताण येतो. मासे खाल्ल्यानंतर लगेच अल्कोहोल घेतल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

fish eating habits (6)

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेवताना ही एक चूक करताय? पैसे आणि आरोग्य दोन्ही जाईल हातातून
  • मुंबईतून 2 दहशतवाद्यांना अटक, दहशतवादाविरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश
  • आमचा तांदूळ महाग, मग तुम्हाला कमी किंमतीत का विकू? भारत अमेरिकेत बासमती तांदळावरून वाद, थेट…
  • ना सिंदूर, ना मंगळसूत्र.. लग्नानंतर समंथा-राजला असं पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
  • Vastu Shastra : शनिवारी आणि मंगळवारी करा हा सोपा उपाय, वास्तुदोषापासून मिळेल कायमची मुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in