• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माणसाचा नव्हे प्लास्टिक पुतळ्याचा अंत्यसंस्कार, सरण रचलं, आग लावणार तोच… काय घडलं स्मशानभूमीत?

November 28, 2025 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी बातमी आहे. हापूडच्या ब्रजघाट स्मशानभूमीत गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. चार तरुण एचआर नंबरच्या i-20 कारमधून एक चादरीने गुंडाळलेला मृतदेह घेऊन स्मशानभूमीत आले होते. चोघेही शोकाकूल होते. त्यांचा जीवलग मित्र गेला होता. या चौघांनी मृतदेह स्मशानात आणल्यावर अंत्यविधी करण्याची घाई केली. कोणताही धार्मिक विधी न करता अंतिम संस्कार करण्याची त्यांची घाई होती. उपस्थित लोक त्यांना मृतदेहावरील चादर काढून तोंड दाखवायला सांगत होते. पण ते ऐकायला तयार नव्हते. पण जेव्हा लोकांनी दबाव वाढवून चादर हटवली तेव्हा सर्वांच्या अंगावरून सर्रकन काटा गेला. कारण चादरीत मृतदेह नव्हता. तर एक प्लास्टिकचा पुतळा होता आणि त्याचाच अंत्यविधी सुरू होता.

स्मशानभूमीत काम करणाऱ्या नितीनने याबाबतचे सविस्तर वृत्त मीडियाला दिलं आहे. हे वृत्त ऐकून सर्वांनाच धक्का बसला. हे चारही तरुण चादर काढण्यास टाळाटाळ करत होते. जेव्हा त्यांच्यावर दबाव वाढवला तेव्हा ते वाद घालायला लागले. पण लोकही ऐकायला तयार नव्हते. लोकही हट्टाला पेटले आणि अखेरीस चादर हटवली. तेव्हा समोर प्लास्टिकचा पुतळा पडलेला दिसला. त्यामुळे स्मशानभूमीत एकच धावपळ उडाली, असं नितीनने सांगितलं. त्यानंतर याच नितीनने पोलिसांना फोन लावला आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन तरुणांना अटक केली. तर दोघांना स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलंय.

आणखी दोन पुतळे सापडले

पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारची तपासणी केली. तेव्हा कारमध्ये आणखी दोन पुतळे सापडले. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली. तेव्हा आरोपी भलत्याच कहाण्या सांगू लागले. काय तर म्हणे, हॉस्पिटलने आम्हाला नकली मृतदेह दिला. हॉस्पिटलनेच सील केलेला मृतदेह दिल्याने आम्ही अंतिम संस्कारासाठी घेऊन आलो. आम्हाला यातील काही माहीत नाही. आम्ही फक्त अंतिम संस्काराला घेऊन आल्याचं या तरुणांनी सांगितलं. पण पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवत विचारणा केली. त्यावेळी या आरोपींच्या कबुलीत फरक असल्याचं आढळून आल्याने पोलिसांनीही दांडका दाखवून त्यांच्याकडून सत्य वदवून घेतलं.

50 लाखासाठी…

पोलिसांनी अटक केलेल्या दोघांपैकी एक दिल्लीचा कापड व्यापारी कमल सोमानी आणि आशिष खुराणा आहे. या दोघांनीही आधी कहाण्या रंगवल्या. पण पोलिसांचे दणके बसताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले. कमल सोमानीने तर स्पष्टच सांगितलं. आपल्यावर 50 लाखाचं कर्ज आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून आपण डिप्रेशनमध्ये आहोत. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला विमा कंपनीला ठकवायचे होते. त्यासाठीच हा निकली अंत्यसंस्काराचा प्लान केल्याचं सोमानी म्हणाला.

ओळखीच्या व्यक्तीच्या नावावर…

या तिघांनी ओळखीच्या व्यक्तीला मृत दाखवून पैसे लाटण्याचा डाव रचला होता. अंशुल नावाच्या ओळखीच्या व्यक्तीचे त्यांनी आधार आणि पॅनकार्ड घेतले होते. त्यानंतर अंशुलच्या नावाने टाटा एआयचा 50 लाखाचा विमा काढला आणि वर्षभर विम्याचा हप्ता नियमित भरला. त्यानंतर अंशुलच्या मृत्यूचं नाटक करून विमाचे 50 लाख रुपये हडप करण्याची योजना आखली. या योजनेनुसार दुकानातून एक मॅनक्विन खरेदी केली. तिला चादरने गुंडाळले आणि त्याचाच अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्लान फसला.

अन् अंशुल म्हणाला…

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू असतानाच अंशुलला कमलच्या मोबाईलवरून व्हिडीओ कॉल केला. पोलीस स्वत: त्याच्याशी बोलले. मी ठणठणीत आहे. सुरक्षित आहे. मला कोणताही आजार नाही आणि प्रयागराजमध्ये मी खुशीत राहत आहे, असं अंशुलने पोलिसांना सांगितलं. तसेच आपल्या नावाने कोणताच विमा काढला नसल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे या चारही आरोपींची पोलखोल झाली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
  • IND vs SA : चौथ्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू मालिकेतून आऊट
  • …तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्याचं खळबळ उडवून देणारं विधान!
  • Netflix पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतेय ‘ही’मजेदार वेब सीरिज…
  • 501 वर्षांनंतर सफला एकादशीला मोठा योगायोग, या दिवशी अवश्य करा ‘हे’ विशेष उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in