• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझा मुलगा 4 वर्षांपासून..; खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या मराठी अभिनेत्रीची सासू स्पष्टच म्हणाली

December 30, 2025 by admin Leave a Comment


गोरेगावमधल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी एक मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर असून ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारलेली अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. कांदिवली इथली हेमलता आणि सांताक्रूझ इथली अमरिना झवेरी या दोघींनी मिळून एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना दोघींना मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहाथ पकडलं होतं. हे वृत्त समोर येताच आता अर्चना यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा चार वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

अर्चना पाटकर यांची पोस्ट-

‘मायबाप प्रेक्षकांना तसंच मीडियाला नमस्कार, मी गेली 40 वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे. म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका’, असं अर्चना यांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Patkar (@archanapatkar10)

नेमकं प्रकरण काय?

नोव्हेंबरमध्ये अंधेरी पश्चिम इथल्या एका हॉटेलमध्ये एका बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाइट्सच्या वापरावरून हा वादा सुरू झाला होता. लेझर लाइट्सवरून हेमलता, अमरिना यांनी बिल्डरच्या मुलाशी वाद घातला होता. हा वाद नंतर इतका वाढला की त्याचं हाणामारीत रुपांतर झालं. या वादानंतर 23 नोव्हेंबरला महिलांनी पोलीस ठाण्यात बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी त्यांनी बिल्डरकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. अखेर दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीनंतर ही रक्कम 5.5 कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dharmendra : धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानला अश्रू अनावर, ‘इक्कीस’च्या स्क्रीनिंगला काय घडलं ?
  • ही मुलगी होणार प्रियांका गांधी यांची सून, लगीनघाई सुरू, जाणून घ्या प्रियांका गांधी यांच्या सूनेबद्दल, मुलगा रेहान..
  • BAPS: सत्पुरुषांची लक्षणं कोणती? भगवंताचा साक्षात्कार होणार कसा? या सत्संगाने तुमच्या सर्व प्रश्नांची एका क्षणात उत्तरं मिळणार
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उरले फक्त काही तास, उमेदवारीसाठी वेटिंगवाले टेन्शनमध्ये… काय काय घडतंय?
  • पुण्यात प्रचंड मोठ्या घडामोडींना सुरूवात, नीलम गोऱ्हे यांनी थेट सांगितलं काय घडलं, म्हणाल्या, एबी फॉर्म…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in