
भाजपमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार इनकमिंग सुरू आहे. गुरुवारी नाशिकमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला. यावरून आमदार देवयानी फरांदे यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. जर निष्ठावंंतांचा बळी जाणार असेल तर ही गोष्ट काही योग्य नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली, दरम्यान त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाच इशारा भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार, असं मोठं वक्तव्य भाजपचे आमदार आणि नेते सुभाष देशमुख यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले सुभाष देशमुख?
भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार जर भाजपमधून आमच्या निष्ठावानांना तिकीट मिळाले नाही तर ते महायुतीतील इतर पक्षात जातील आणि आम्ही तरी देखील त्यांचा प्रचार करू, पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते? याचं आश्चर्य वाटतं भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही, अशा शब्दात सुभाष देशमुख यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये निष्ठावान विरूद्ध पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या लोकांमध्ये संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे, यामुळे पक्षात मोठी बंडखोरी देखील होऊ शकते.
भाजपात जोरदार इनकमिंग?
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मत मोजणी आहे. दरम्यान याआधी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या, या निवडणुकीमध्ये भाजपात जोरदार इनकमिंग झाल्याचं पहायला मिळालं, दरम्यान त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत देखील भाजपानं हा पॅटर्न कायम ठेवल्याचं पहायला मिळत आहे.
Leave a Reply