• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठी अभिनेत्रीला दीड कोटींची खंडणी घेताना पकडलं रंगेहाथ; बिल्डरकडून गुन्हा दाखल

December 28, 2025 by admin Leave a Comment


मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक केली आहे. याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडलं. खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतल्या दोन्ही महिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पहिल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठी अभिनेत्रीविरोधात गुन्हा

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कांदिवली इथल्या रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ ​​हेमलता बाणे (वय 39 वर्षे) आणि सांताक्रूझ इथल्या रहिवासी अमरिना इक्बाल झवेरी उर्फ ​​एलिस उर्फ ​​अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (वय 33 वर्षे) अशी झाली आहे. हेमलता पाटकर या मराठी अभिनेत्री आहेत. पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, हेमलता पाटकर यांच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323 आणि 504 अंतर्गत यापूर्वीच एक फौजदारी गुन्हा दाखल आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं की, त्यांनी यापूर्वी असे किती गुन्हे केले आहेत, याची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली.

तपासात सहकार्य नाही- पोलीस

अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, खंडणीची रक्कम कशी द्यायची होती, याचा तपशीलवार लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, हेमलता पाटकर यांचे हस्ताक्षराचे नमुने अद्याप गोळा करायचे आहेत, तर अमरिना झवेरी यांचे आवाजाचे नमुने घेणेही बाकी आहे. तपास अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, दोन्ही आरोपी महिला तपासात सहकार्य करत नाहीत. आरोपींनी इतर फरार आरोपींसोबत मिळून इतर पीडितांकडूनही खंडणी उकळली असावी, असाही पोलिसांना संशय आहे.

गोरेगाव पश्चिम इथले रहिवासी असलेले तक्रारदार अरविंद गोयल (वय 52 वर्षे), जे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत, यांनी आरोप केला आहे की, आरोपींनी त्यांच्या मुलावर आंबोली पोलीस ठाण्यात दाखल झालेला फौजदारी खटला मिटवण्यासाठी 10 कोटींची मागणी केली. बिल्डरने याप्रकरणे गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cheapest Beer: केवळ 18 रुपयांमध्ये बिअर, या देशात पाण्यापेक्षा स्वस्तात मिळतेय दारू
  • मोठी बातमी ! जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच अचानक शिवसेनेच्या बड्या नेत्याची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
  • ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 तासात 80 ड्रोन हल्ले, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानानेच भारताचा पराक्रम सांगितला; नवी माहिती समोर!
  • ई-सिगारेट ओढायची, थेट डोळेच गेले, महिलेसोबत भयंकर घडलं; डॉक्टरांच्या इशाऱ्याने चिंता वाढली!
  • वंचित-काँग्रेस यांच्यात ऐतिहासिक युती, मुंबई पालिका निवडणुकीचं गणित बदलणार; नेमकं काय होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in