• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मथुरेत हेमा मालिनी थेट ‘या’ अवस्थेत, मोठी खळबळ, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोन्ही मुलींनीही..

December 14, 2025 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल कुटुंबियांकडून गुप्तता पाळण्यात आली. धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मुंबईमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, आपल्या लाडक्या अभिनेत्याची शेवटची झलकही चाहत्यांना बघायला मिळाली नाही. देओल कुटुंबावर यामुळे लोक नाराज झाले. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन केले. या प्रार्थना सभेला अनेक बॉलिवूड स्टार पोहोचले. मात्र, हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली या धर्मेंद्र यांच्या मुंबईतील प्रार्थना सभेपासून दूर राहिल्या. त्यानंतर दिल्लीमध्ये हेमा मालिनी, ईशा देओल आणि अहान देओल यांनी धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले. धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला अमित शहा देखील पोहोचले होते. यावेळी हेमा मालिनी भावूक होताना दिसल्या.

दिल्लीनंतर हेमा मालिनी यांनी मथुरेत धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचे आयोजन केले. यावेळी धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. उपस्थित लोकांनी हेमा मालिनी यांना सावरले. यादरम्यान बोलताना हेमा मालिनी यांनी म्हटले की, आपल्या प्रिय धर्मेंद्रसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करावे लागेल, असा विचारही कधीच केला नव्हता.

हा एक असह्य धक्का होता. आम्ही 57 वर्षे एकत्र घालवली आणि 45 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. विशेष म्हणजे त्यापैकी 25 पेक्षा जास्त चित्रपट सुपरहिट होते. माझे पडद्यावरील प्रेम खऱ्या आयुष्यात माझे जीवनसाथी बनले, याबद्दल मला आजही आश्चर्य आणि आनंद वाटतो. कारण आमचं प्रेम खरं होतं..त्यामुळे आम्ही एकत्र मिळून आव्हानांना सामोरे गेलो आणि लग्नही केले.

#WATCH | Mathura, UP | A condolence meeting was organised at Shri Krishna Janmashtami Ashram in Vrindavan today, where people paid tribute to the late veteran actor Dharmendra.

Veteran actor and BJP MP Hema Malini also present at the meet. pic.twitter.com/6InLcI9zx1

— ANI (@ANI) December 13, 2025

हे सर्व बोलताना हेमा मालिनी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. दिल्ली येथील प्रार्थना सभेत हेमा मालिनी यांच्या दोन्ही लेकी त्यांच्यासोबत होत्या. हेच नाही तर ईशा देओल हिचा एक्स पतीही यावेळी खंबीरपणे उभा दिसला. मात्र, मथुरेत झालेल्या सभेत हेमा मालिनी एकट्या दिसल्या. यावेळी त्यांच्या दोन्ही लेकी त्यांच्यासोबत नव्हत्या. दिल्लीतील प्रार्थना सभेत आईला सांभाळताना अहाना आणि ईशा देओल या दोघी दिसल्या होत्या.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rehman Dakait : ज्याला दाऊद इब्राहिम देखील थरथर कापायचा, तो रहमान डकैत नेमका कोण? जाणून घ्या संपूर्ण कुंडली
  • ‘धुरंधर’ समोर ‘हा’ चित्रपट धुमाकूळ घालतोय, देतोय तगडी टक्कर; अवघ्या तीन दिवसांत इतके बजेट वसूल
  • या छोट्या देशाचा भारताला सर्वात मोठा धक्का, होणार प्रचंड नुकसान, एका निर्यणामुळे देशभरात खळबळ
  • मुस्लीम देशातील आदिवासींचे डोळे निळेशार, पण ठरला अभिशाप, कारण तरी काय?
  • तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in