
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार लग्नानंतर महिला गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे महिलांच्या 16 श्रृगारांपैकी एक आहे. मंगळसूत्राला हिंदू धर्माशास्त्रात विशेष महत्त्व आहे. मंगळसूत्र हे महिलेच्या पतीचे रक्षण करते, असेही म्हटले जाते.
खरं म्हणजे काळा रंग हा अनेकजण अशुभ मानतात. असे असताना मंगळसूत्रातील मणी हे काळ्याच रंगाचे का असतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. याच पार्श्वभूमीवर मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व जाणून घेऊ.
धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्रातील काळे मणी हे महिलेचे तसेच महिलेच्या पतीचे नकारात्मक उर्जेपासून रक्षण करतात. काळ्या मण्यांमुळे पती आणि पत्नीचे नेते चांगले राहते, असाही दावा केला जातो.
काळे मणी हे शक्ती देवीचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळेच काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असल्यामुळे वैवाहिक जीवण स्थिर राहण्यास मदत होते. संसारातही सुख-शांती नांदते असा दावा केला जातो.
काळ्या मण्यांमुळे पती-पत्नीच्या नात्याता शांतता राहते, असेही म्हटले जाते. असे असले तरी आता बऱ्याच महिलांनी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालणे सोडून दिले आहे. आधुनिकतेला स्वीकारत अनेक महिला गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत. गळ्यात मंगळसूत्र असल्यामुळेच पतीचे रक्षण होते असे नाही, असे अनेक महिलांचे मत आहे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.





Leave a Reply