
पुजा अर्चा करताना किंवा उपवास करताना सात्विक आहार घ्यायचा असतो असे आपण आजवर ऐकले आणि वाचले असेल. परंतू तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातील काही मंदिरात प्रसाद म्हणजे नॉनव्हेज दिले जाते. भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जेथे देवीला किंवला ग्रामदैवताला मांसाहार अर्पण केला जातो. या मागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. चला तर अशा मंदिराची माहिती घेऊयात…
मुनियंडी स्वामी मंदिर, तामिलनाडु
तामिळनाडू येथील मदुरई जिल्ह्यातील छोटे गाव वडक्कमपट्टीतील मुनियंडी स्वामी मंदिरात भगवान मुनियादी ( भगवान शिवाचे अवतार मुनिश्वरर नावाने ओळखले जातात ) यांची पूजा केली जाते. दरवर्षी येथे तीन दिवसांचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या मंदिरात प्रसाद म्हणून चिकन आणि मटण बिर्याणी दिली जाते. लोक सकाळी बिर्याणी खाण्यासाठी मंदिरात गर्दी करतात.
विमला मंदिर, ओडिशा
देवी विमला वा बिमला (दुर्गा मातेचे एक रूप) या देवीला पूजेदरम्यान मांस आणि मासळीचा नैवेद्य दाखवला जातो. हे मंदिर ओडीशाच्या पुरी स्थित जगन्नाथ मंदिर परिसरात आहे आणि यास शक्तीपीठांमध्ये गणले जाते. दुर्गा पूजेत मंदिरातील पवित्र मार्कंडा तलावात मासे पकडले जातात आणि देवीला अर्पण केले जातात. सकाळी आधी बळी दिलेल्या बकऱ्याचे मटण शिजवून देवीला अर्पण केले जाते. हे दोन्ही पदार्थ बळीची प्रक्रिया पाहणाऱ्यांना प्रसाद म्हणून वाटले जातात. हे तेव्हा होत जेव्हा भगवान जगन्नाथ यांचे दरवाजे उघडलेले नसतात.
टारकुलहा देवी मंदिर, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील गोरखपूर स्थित टारकुलगा देवी मंदिरात दरवर्षी खिचडी मेळा भरतो. हे मंदिर लोकांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. देशभरातील लोक चैत्र नवरात्रीत येथे येतात नवस म्हणून देवीला बकऱ्याचा बळी देतात. याचे मांस मातीच्या भांड्यात शिजवले जाते. आणि भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाते.
पारसिनिक कडवु मंदिर, केरळ
पारसिनिक कडवु मंदिर भगवान मुथप्पन यांना समर्पित आहे.भगवान मुथप्पन हे कलियुगात जन्मले असून ते विष्णू आणि शिवाचा अवतार मानले जातात. दक्षिण भारतात त्यांना अनेक नावांनी ओळखले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. येथे प्रसादात भाजलेली मासळी आणि ताडी भगवान मुथप्पन यांना अर्पण केली जाते. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. हा प्रसाद नंतर भक्तांना दिला जातो.
कालीघाट, पश्चिम बंगाल
हा देशातील ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे आणि २०० वर्षे जुने देवस्थान आहे. येथे बहुतांश भक्त देवी कालीला प्रसन्न करण्यासाठी बकऱ्याचा बळी देता. बळी दिल्यानंतर हे मांस शिजवले जाते. आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते.
कामाख्या मंदिर, आसाम
कामाख्या मंदिर प्रसिद्ध आहे.ते एक प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे माँ कामाख्या देवीची पूजा तांत्रिक शक्तींसाठी केली जाती. हे मंदिर आसामच्या नीलाचल पर्वतात आहे. नैसर्गिक दृष्ट्या सुंदर प्रांतात आहे. येथे देवीला दोन प्रकारचा नैवेद्य दिला जातो. एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी, हे दोन्ही नैवेद्य विना कांदा -लसूण बनवले जातात. मांसाहारी प्रसादात बकऱ्याचे मटण असते. ज्यास देवीला अर्पण करुन नंतर प्रसाद वाटला जातो. कधी माशाची चटणी तयार केली जाते. हा नैवेद्य दुपारी १ ते २ या दरम्याने देवीला चढवले जातात. यावेळी मंदिराचे मुख्यद्वार बंद असते.
तारापीठ, पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ मंदिर दुर्गा भक्तांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. येथेही लोक देवीला मांसाचा नैवेद्य अर्पण करतात. यावेळी देवीला मद्य देखील चढवले जाते. नंतर हा प्रसाद म्हणून लोकांना वाटला जातो.
दक्षिणेश्वर काली मंदिर, पश्चिम बंगाल
दक्षिणेश्वर काली मंदिर हे पश्चिम बंगाल येथील एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. या मंदिरात देवीला नैवेद्यात मासळी दिली जाते. नंतर पूजा झाल्यानंतर ही भक्तात वाटली जाते. मात्र या मंदिरात कोणत्याही प्राण्याची बळी दिला जात नाही.
Leave a Reply