• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचा पहिल्याच दिवशी पराभव, पाकिस्तानने पाडली होती विमान, पृथ्वीराज चव्हाण यांचा ऑपरेशन सिंदूरबाबत खळबळजनक दावा…

December 17, 2025 by admin Leave a Comment


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल धक्कादायक खुलासा केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्याने मोठ्या वादाला तोंड फुटले असून त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल हे विधान केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारताला पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरदरम्यान पराभवाचा सामना करावा लागला. हेच नाही तर यादरम्यान पाकिस्तानने भारतीय लष्कराची विमानेही पाडली होती. भारतीय लष्कराच्या हातात काहीच राहिले नव्हते. हवाई दल जमिनीवर अडकून पडले होते. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्यानंतर वादाची मोठी ठिंगणी पडली असून पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, लोकांनी याचा स्विकार करू किंवा नाही ही वस्तुस्थिती आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, बठिंडा, सिरसा आणि ग्वाल्हेरमधून एखादे जरी विमान उडाले असते तर पाकिस्तान लष्कराकडून ते पाडले जाण्याची 100 टक्के शक्यता होती. या कारणामुळे हवाई दलाचे विमान खालीच थांबून होते, त्यांना उड्ढाण करणेही शक्यत होत नव्हते. यादरम्यान बोलताना त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेतील ‘एपस्टाईन फाइल्स’ 19 डिसेंबर रोजी अमेरिकन काँग्रेसमध्ये सार्वजनिक केल्या जातील.

या फाइल्समध्ये उघड होणारी माहिती जगासाठी धक्कादायक असेल आणि त्याचा थेट परिणाम भारतातील राजकारणावर होईल. जेफ्री एपस्टीन नावाच्या एका व्यक्तीने भारतातील काही लोकांसह जगभरातील अनेक मोठ्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या आहेत. ज्यात भारतातील काही लोकांचा समावेश आहे. ती फाईल उघड झाली तर भारतात खळबळ उडेल.

यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते की, देशातील पंतप्रधान बदलले जाण्याची शक्यता आहे. नागपूरमधील व्यक्ती पंतप्रधानपदावर विराजमान होतील. हैराण करणारे म्हणजे ते आजही आपल्या त्या दाव्यावर ठाम आहेत. अमेरिकेतील ‘एपस्टाईन फाइल्स’ 19 फाईलमध्ये नेमके काय आहे, यावरून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानाच्या पदावरून गेलेल्या विधानानंतर त्यांन ऑपरेशन सिंदूरबद्दल धक्कादायक दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ उडाली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manikrao Kokate : अटक वॉरंटनंतरही माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद वाचणार? सर्वात मोठी बातमी समोर
  • पाकिस्तानमध्ये जाऊन शूट झाली का रणवीर सिंहची धुरंधर? मुंबईसह ‘या’ ठिकाणी झाले कराची सारख्या दिसणाऱ्या ठिकाणंच शुटिंग
  • कोकाटे यांचे मंत्रिपद जाणारच, थेट कायद्यातील तरतूद समोर; सरोदेंनी सगळं सांगितलं!
  • Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंना शिक्षा होताच अर्जदाराची मुख्यमंत्री फडणवीसांना एकच कळकळीची विनंती की, साहेब…
  • Prajakta Gaikwad On Wedding : प्राजक्ता गायकवाड हिने रिसेप्शनमध्ये का घेतली नंदीवरुन एन्ट्री? पुराणांमध्ये आहे उल्लेख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in