• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भयंकर किळसवाणी स्पर्धा, जीवंत झुरळांना खायचे होते, परंतू एका स्पर्धकाने जे केले..

November 28, 2025 by admin Leave a Comment


जगात चित्र विचित्र स्पर्धा होत असतात. काही स्पर्धा या रिस्की असतात. त्यात एखाद्याच्या प्राणावर देखील बेतू शकते. झुरळ म्हटले की अतिशय किळसवाणा किटक. परंतू या झुरळाला तेही जीवंत खायचे असेल तर तुमचे धाडस होईल काय ? अशीच एक स्पर्धात आयोजित करण्यात आली होती. त्यात जीवंत झुरळांना खायचे होते. जो जास्तीत जास्त जीवंत झुरळे खाईल तो विजेता ठरणार होता. परंतू या स्पर्धेत विपरित घडले….

ही जीवंत झुरळं खाण्याची अजिब स्पर्धा अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जीवंत झुरळ खाण्यासाठी अनेक स्पर्धकांत चढाओढ दिसून आली. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बिचवर राहणारे 32 वर्षीय एडवर्ड आर्कबोल्ड पोहचले होते. या स्पर्धेचे नाव “मिडनाईट मॅडनेस” ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन डिअर फिल्ड बीच येथील Ben Siegel Reptile Store द्वारा एका प्रमोशनल इव्हेंटच्या रुपात केले होते. या स्पर्धेत जिंकणाऱ्यास एक जीवंत मादी पायथन अजगर भेट म्हणून दिला जाणार होता. एडवर्ड सुरुवातील जीवंत झुरळे पटापट खाऊ लागला होता. परंतू ही स्पर्धा त्याची अखेरची स्पर्धा ठरली.

अजब स्पर्धेत घेतला भाग, पण…

एडवर्ड याची गर्लफ्रेंड नताशा प्रोफीट हिच्या मते त्याने आधी अशा प्रकारचे किडे -मकोडे खाण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतही जिंकून हा अजगर तो त्याच्या एका मित्राला तो भेट देण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला. फ्लोरिडा विद्यापीठाची एंटोमोलॉजीची स्टुडण्ट सारा बर्नार्ड देखील या स्पर्धेच्या वेळी हजर होती. तिने सांगितले की ही स्पर्धेचे अनेक राऊंड होते. प्रत्येक राऊंडमध्ये उमेदवारांना वेग-वेगळे किडे खायच होते.

अंतिम राऊंडमध्ये स्पर्धकांना ३ ते ४ इंच लांबीची जीवंत झुरळं खायची होती. ३० स्पर्धकांपैकी एडवर्ड यालाच गंभीर स्वरुपात अस्वस्थ वाटू लागली. स्पर्धा संपताच एडवर्ड उलटी करु लागला आणि अचानक तो कोसळला. आयोजकांनी डॉक्टरांच्या पथकाला बोलावले. परंतू तोपर्यंत उशीर झाला होता. तपासानंतर कळले की त्याच्या गळ्यात आणि श्वासनलिकेत झुरळाचे तुकडे अडकले होते. त्यामुळे त्याचा श्वास गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला. मिररच्या बातमीनुसार ही घटना साल २०१२ ची आहे. परंतू पुन्हा ती चर्चेत आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्याला बेदम मारहाण… रक्तबंबाळ अवस्थतील धक्कादायक व्हिडीओ समोर…
  • स्वप्नात वाघ दिसणे शुभ असते की अशुभ? स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ काय?
  • लग्न लावून फसवणूक करीत लुटमार करणाऱ्या टोळीची तोडफोड, नवरदेवाच्या बापाचेही केले अपहरण
  • IPL Auction 2026 : आयपीएल लिलावात 5 अज्ञात खेळाडू खाणार भाव, वैभव सूर्यवंशीसारखी आहे छबी
  • Dhurandhar : धुरंधरमधल्या रहमान डकैतच्या सुंदर बायकोचा खऱ्या आयुष्यातला नवरा खूपच साधा माणूस, फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in