
भारताचा स्टार क्रिकेटपटू दीपक चहर याची बहीण मालती चहर बिग बॉस 19 च्या घरात दाखल झाली होती. सुरूवातीला तिचा गेमही चाहत्यांना आवडला. मात्र, ज्याला मित्र मानले, त्याच्याविरोधातच जाऊन मालती अनेकदा भांडताना दिसली. मालती बिग बॉस 19 च्या फिनालेला पोहोचली होती. यावेळी तिने सलमान खान याच्याकडे शहनाज गिल हिच्या भावाची तक्रार केली. मालती चहरला सुरूवातीला लोक सपोर्ट करताना दिसले. मात्र, फिनालेला काही तास शिल्लक असतानाच बिग बॉसच्या घरातून तिला बाहेर यावे लागले. आता मालती चहर ही काही मोठे खुलासे करताना दिसत आहे. मालती चहर बिग बॉसच्या घरातून आल्यापासून काही मोठे खुलासे करत आहे. नुकताच तिने एक मुलाखत दिली आहे. तिने अनिल शर्माच्या चित्रपटात डेब्यू केला.
मालती चहर तिने धक्कादायक खुलासा करत म्हटले की, ती इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. एका दिग्दर्शकाने तिच्याशी गैरवर्तन केले होते. हैराण करणारे म्हणजे हा दिग्दर्शक थेट तिच्या वडिलांच्या वयाचा होता. एका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याने तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. मालतीने म्हटले की, या इंडस्ट्रीमधील काही लोकांनी तिला खूप जास्त त्रास दिला आहे.
मालतीने हे देखील स्पष्ट केले की, इंडस्ट्रीत ती नवीन असताना तिच्यासोबत या गोष्टी घडत होत्या आणि त्यावेळी तिने नुकताच आपल्या करिअरची सुरूवात केली होती. मला येथे काम करताना सर्वा मोठी गोष्ट माझ्या आयुष्यातील वाईट काळात समजली की, इथे कोणीही कोणाचे नसते.
मालती चहर हिने म्हटले की, माझ्यासोबत अशा काही चुकीच्या गोष्टी घडल्या येथे ज्याबद्दल मी माझ्या वडिलांनाही सांगितले. काही लोकांनी दोन ते तीन वेळा आपले चान्स मारण्याचा प्रयत्न केला. पण मी कोणालाही त्यांची मर्यादा ओलांडू दिली नाही. इथे लोक खूप जास्त पुढचे आहेत. एक दोन जणांनी तर बोलतानाचा चुकीच्या गोष्टी केल्या. ते लोक तुमच्या बोलण्यावरूनच तुम्हाला ओळखतात.
मालती हिने पुढे बोलताना म्हटले की, मी कामानिमित्त एका मोठ्या चित्रपट दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जात होते. त्याने एकेदिवशी थेट मला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. मी थक्क झाले होते. काय झाले हेच मला कळत नव्हते. मी त्याला तिथेच गप्प केले आणि त्यानंतर त्याला पुन्हा कधीही भेटले नाही. तो खूप म्हातारा आहे. यादरम्यान बोलताना मालतीने म्हटले की, इथे असे आहे की, कोणतीही तडजोड नाही तर कोणतेही काम नाही.
Leave a Reply