
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सिझनचा उपविजेता जय दुधाणे नुकताच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड हर्षला पाटीलशी त्याने धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'तू, मी आणि आयुष्यभराचं प्रेम', असं कॅप्शन लिहित जय दुधाणेनं हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत त्याने लग्नाची तारीखसुद्धा '24.12.2025' या कॅप्शनमध्ये लिहिली आहे. जय आणि हर्षलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
लग्नसोहळ्यातील जयचा पोशाखसुद्धा लक्षवेधी होती. त्याच्या कुर्त्यावर मंत्र लिहिलेले होते. तर हर्षलाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या दोघांचा हा पारंपरिक लूक चाहत्यांना खूपच आवडला. जयच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते.
जयची पत्नी हर्षला ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलसंदर्भातील व्हिडीओ ती पोस्ट करत असते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
लग्नाच्या दोन दिवस आधीच कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावर्षी मार्च महिन्यात जयने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. उत्तराखंडच्या ट्रिपदरम्यान जयने हर्षलाला अत्यंत रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं होतं.





Leave a Reply