
प्रत्येकालाच विदेशात फिरायला जावं वाटतं. विदेशातील बर्फ, डोंगर, दऱ्या, बिच फिरून निसर्गाचा आनंद घ्यावा, असे अनेकांचे नियोजन असते. फिरण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वातंत्र्य अनुभवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. युरोपात जाऊन हे स्वप्न पूर्ण करावे, असे अनेकांना वाटते. परंतु आता याच युरोपात पर्यटकांसाठीचे नियम कठोर करण्यात आले आहेत.
आता युरोपातील अनेक शहरांत पर्यटकांसाठीचे नियम कठोर करण्यात आले आहेत. काही शहरांत बिकनी परिधान करण्यास बंदी आहे. तर काही ठिकाणी चप्पल घालून ड्रायव्हिंग करण्यास मनाई आहे. त्यामुळे हे नियम का बदलण्यात आलेले आहेत, असे विचारण्यात आले आहे.
अलिकडे युरोपात पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पर्यटक युरोपातील शहरे, बीच, द्विपांवर जाऊन दंगा, मस्ती करतात. त्यामुळे स्थानिकांचे जीवन प्रभावती होते. त्यामुळेच युरोपात अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. स्पेन, इटली, फ्रान्स, क्रोएशिया या ठिकाणी बिकिनी फक्त समुद्रकिनाऱ्यावरच घालण्यास परवानगी आहे.
बार्सिलोना, कान्स, व्हेनिस, स्प्लिट, सोरँटो या शहरात बिकिनी घालून रस्त्यावर फिरल्यास मोठा दंड आकारण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी हा दंड एक लाख रुपयांपर्यंत आहे. युरोपात वाहन चालवण्याबाबत लोक फार गंभीर असतात.
स्पेन, ग्रीक, इटली, फ्रान्स यासारख्या देशात फ्लिप-फ्लॉप किंवा चप्पल परिधान करून दुचाकी चालवल्यास कारवाई होते. ग्रीक देशात वाळूमधून शंख, दगड उचलण्यावर बंदी आहे. असा गुन्हा केल्यास कारवाई होते.




Leave a Reply