
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कमालीची गुप्तता पाळण्यात आली. धर्मेंद्र यांचे अखेरचे दर्शनही त्यांच्या चाहत्यांना मिळाले नाही. देओल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या प्रत्येक गोष्टीपासून मिडियालाही दूर ठेवले. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार मुंबईत करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबियांनी ज्याप्रकारे गुप्तता पाळली त्यानंतर लोकांमध्ये देओल कुटुंबियाबद्दल नाराजी बघायला मिळत आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबियांनी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या प्रार्थना सभेला बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पोहोचले होते. मोठी गर्दी होती. संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. भजनाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते.
धर्मेंद्र यांच्या या प्रार्थना सभेला हेमा मालिनी किंवा त्यांच्या दोन्ही मुली पोहोचल्या नव्हत्या. फक्त देओल कुटुंबिय उपस्थित होते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणीत दिल्ली आणि मथुरेत प्रार्थना सभा ठेवली होती. हेमा मालिनी प्रार्थना सभेला उपस्थित नसल्याने विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता नुकताच मनोज देसाई यांनी धर्मेंद्र यांच्या मुंबईतील प्रार्थना सभेबद्दल मोठे विधान केले असून तिथे नेमके वातावरण कसे होते हे त्यांनी सांगितले.
मनोज देसाई यांनी म्हटले की, बरे झाले तिथे हेमा मालिनी आल्या नाहीत. मनोज देसाई यांनी म्हटले की, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या श्रद्धांजली सभेसाठी ते हजारो लोकांसोबत उभे होते. सनी देओल यांना भेटण्यासाठी त्यांना बराच वेळ थांबावे लागले. ते म्हणाले, गाड्यांची खूप मोठी रांग लागली होती. माझ्या गाडीसमोर अनेक गाड्या होत्या. जगभराती लोक तिथे पोहोचली होती. मी सनी देओलला भेटलो आणि त्याला सांगितले की, खूप लोक येत आहेत.
इतकी जास्त गर्दी होती की, मी गाडीत 45 मिनिट अडकून पडलो होतो. माझ्या गाडीच्या मागे आणि पुढे मोठ्या गाड्या होत्या. इतकी गर्दी कधीच मी प्रार्थना सभेला बघितली नव्हती. पुढे बोलताना मनोज देसाई यांनी म्हटले की, हेमाजी आल्या नाहीत याचे मला आश्चर्य वाटले नाही. कोणताही वाद घडण्यापूर्वीच त्या दूर राहिल्या. त्यांनी त्यांच्यासाठी आधीच एक स्वतंत्र प्रार्थना सभा आयोजित केली होती. त्या आल्या नाहीत हेच चांगले झाले, असे थेट मनोज देसाई यांनी म्हटले.
Leave a Reply