
आजच्या या युगात प्रत्येकाकडे फ्रिज आहे. आपण प्रत्येकजण भाज्या, फळ, काही पदार्थ जास्त दिवस ताज्या राहावे यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो. पण तुम्हाला माहित आहे का की हे अजिबात खरं नाहीये. तुम्हीच नाही तर अनेकजण उरलेलं अन्न, फळं, तेलकट खाद्य पदार्थ फ्रीजरमध्ये ठेऊन ते दोन दिवसांनी खाता येतील अशी आशा ठेवतात. पण फ्रिजचे थंड तापमान खाद्यपदार्थांसाठी घातक ठरतात. कारण हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवताक्षणी आरोग्यासाठी धोकादायक बनतात.
फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवल्याने त्यांची चव आणि पोत खराब होतेच, शिवाय कधीकधी त्यांच्या पौष्टिक गुणवत्तेलाही नुकसान पोहोचू शकते, कारण फ्रिजची थंड आणि कोरडी हवा प्रत्येक अन्नपदार्थासाठी योग्य नसते. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? चला जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल जे कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नयेत.
बटाटा
फ्रिजच्या थंडी हवेमुळे बटाट्यांमधील स्टार्च साखरेत रूपांतरित होते, ज्यामुळे ते शिजवल्यावर गोड आणि अनहेल्दी होतात. म्हणून बटाटे थंड, कोरड्या जागी ठेवा.
टोमॅटो
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांचा रस आणि गोडवा कमी होतो, ज्यामुळे अन्नाची चव खराब होऊ शकते.
कांदा
फ्रिजमधील आर्द्रतामुळे कांदा मऊ होऊ शकतो आणि कुजण्याची प्रक्रिया वेगवान होते. यामुळे कांदे नेहमी जाळीदार टोपलीत ठेवा.
लसूण
लसूण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याला अंकूर फुटू शकतो आणि त्याची चव कमी होऊ शकते. आर्द्रतेत लसूण लवकर खराब होऊ शकतो.
केळी
केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची सालं लवकर काळी पडू शकते आणि आतील गर खराब होऊ शकतो. खोलीच्या तापमानावर केळींना पिकू द्या.
मध
मध फ्रिजमध्ये ठेवल्याने ते स्फटिक बनू शकते, ज्यामुळे ते वापरणे कठीण होते. ते नेहमी खोलीच्या तापमानावर हवाबंद भांड्यात ठेवा.
ब्रेड
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर कोरडे आणि त्यांचा मऊ पोत खराब होतो. दीर्घकालीन साठवणुकीसाठी डीप फ्रीजर हा एक चांगला पर्याय आहे.
कॉफी
कॉफी चुकून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील ओलावा शोषला जातो. ज्यामुळे कॉफीची चव आणि सुगंध खराब होऊ शकतो. कॉफी नेहमी हवाबंद डब्यात थंड, कोरड्या जागी ठेवा.
तेल
काही लोक स्वयंपाकाचे तेल देखील फ्रिजमध्ये ठेवतात, परंतु यामुळे तेल घट्ट होऊ शकते आणि कधीकधी पांढरे होऊ शकते.
या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही तुमच्या अन्नाची गुणवत्ता, पोषण आणि चव दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply