
Cyber Fraud: अनोळखी नंबरवर अनेकदा मोबाईलवर कॉल येत असतात. परंतू तुमच्या सोबत कधी असे झाले आहे का ? कॉल तर आला परंतू समोरुन आवाज येत नाही ? अनेक लोकांसोबत असे झाले आहे. जर तुमच्या सोबतही असे होत असेल तर सावधान. गेल्या काही काळापासून सायलेन्ट कॉल्स येत आहेत. लोकांनी याच्या तक्रारी केल्या आहेत. हा सर्व प्रकार तांत्रिक बिघाडामुळे नाही.तर हा आता डेटा चोरी आणि सायबर चोरीचा नवा प्रकार असू शकतो. लोकांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार आता डिपोर्टमेंट ऑफ टेलिकॉमने अलर्ट केले आहे. चला तर Silent Calls द्वारे अखेर स्कॅमर का माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहूयात ?
स्कॅमर्सचा डाव काय ?
डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने X वर पोस्ट शेअर करत सांगितले आहे की हा कोणताही साधारण कॉल नाहीए. स्कॅमर या प्रकारे कॉल करुन या बाबीला जाणण्याचा प्रयत्न करीत आहेत की तुमच्या लोकांचा नंबर एक्टीव्ह आहे की नाही ? जर तुम्हालाही अशा प्रकारचा कॉल आला आणि तुम्ही जर कॉल उचलला आणि समोरुन आवाज आला नाही तर कॉल कट केल्यानंतर कॉल बॅक करण्याची चूक करु नका. अशा प्रकारच्या कॉलद्वारे तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. यामुळे सावधान रहा. कॉल बॅक करण्याऐवजी अशा प्रकारच्या Silent कॉलची लागलीच तक्रार Sanchar Sathi ऐपवर करावी.
तक्रार कशी करावी ?
sancharsaathi.gov.in साईटवर गेल्यानंतर होम पेजवर Citizen Centric Services सेक्शनमध्ये जावे. या सेक्शनमध्ये तुम्हाला Chakshu ऑप्शन नजरेस येईल.या ऑप्शनवर टॅप करावे. यानंतर पुढच्या स्टेपवर तुम्हाला ती पर्याय मिळतील. आधी Malicious Web Links वर रिपोर्ट, फ्रॉडचा रिपोर्ट किंवा स्पॅमचा रिपोर्ट. या पैकी तुम्ही कोणताही एक पर्याय निवडावा लागणार आहे. कोणताही एक ऑप्शनला निवडल्यानंतर तुमच्याकडे काही आवश्यक माहिती मागितली जाईल. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही तक्रार सबमिट करु शकता.
येथे पाहा पोस्ट –
फ़ोन बजा, उठाया… लेकिन उधर कोई आवाज नहीं?
ये कोई आम कॉल नहीं, बल्कि स्कैमर्स का तरीका है ये चेक करने का कि आपका नंबर एक्टिव है ना नहीं। ऐसे कॉल पर कॉल बैक ना करें और संचार साथी ऐप पर तुरंत रिपोर्ट करें।
थोड़ी सी समझदारी, बड़ी ठगी से बचाव
फ़ोन से जुड़े रहें, Silent Call से दूर… pic.twitter.com/LKJ9aIJj7c— DoT India (@DoT_India) December 15, 2025
Leave a Reply