
देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग क्रिएटर्स आणि सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर पायल गेमिंग सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर पायलचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत खासगी क्षण आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पायलही हादरून गेली आहे. या व्हिडीओतील महिलेशी आपला कोणताही संबंध नाही. या व्हिडीओशी आपला संबंध नसून कुणी तरी माझ्या नावाचा गैरवापर करत आहे. त्यामुळे आता कोर्टात दाद मागणार आहे, असं पायलने म्हटलं आहे. या व्हिडीओमुळे पायल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पायल गेमिंग कोण? असं सोशल मीडियावर सर्च केलं जात आहे.
पायल गेमिंग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. इन्स्टाग्रामवर पायलचे 40 लाख फॉलोअर्स आहेत. ज्या सोशल मीडियाने पायलला नावलौकीक मिळवून दिला. आता त्याच सोशल मीडियात काही अपप्रवृत्तींमुळे पायलची बदनामी होत आहे. तिला नको त्या गोष्टींना फेस करावा लागत आहे. एक व्हिडीओ लिक झाला आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं आहे.
फॅन्स पाठीशी खंबीर
पायलचा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत. पण काही फॅन्सकडून पायलचं समर्थन केलं जात आहे. हा पायलचा ओरिजिनल व्हिडीओ नाहीये, असा दावा या फॅन्सकडून केला जात आहे. एआयएद्वारा किंवा डीपफेकचा हा व्हिडीओ असावा. केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. तसेच स्क्रीनशॉट आणि छोट्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असल्याने तिच्या चाहत्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. तर अनेकांनी तर व्हिडीओची पुष्टी झाल्याशिवाय तो व्हायरल करू नका. उगाच कुणालाही बदनाम करू नका, असं काही फॅन्सकडून इतरांना सांगितलं जात आहे. आजकाल डीपफेक व्हिडीओ बनवला जातो. त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय पायल गेमिंगच्या नावाने हा व्हिडीओ व्हायरल करू नका, असं एका यूजर्सने म्हटलं आहे.
मी पायलचा फॅन आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ असली वाटत नाही. व्ह्यूज मिळवण्यासाठी, एखाद्याची इमेज खराब करण्यासाठी एआय व्हिडीओ तयार करणं चुकीचं आहे, असं एका फॅन्सने म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर पायलने मौन सोडलं आहे. त्या व्हिडीओतील महिला मी नाहीये. या व्हिडीओशी माझा काही संबंध नाही. हा फेक व्हिडीओ आहे. माझ्या नावाचा वापर करून हा व्हायरल केला जात आहे. त्यामुळे मी कोर्टात जाऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहे, असं तिने म्हटलंय.
पायल नेमकी कोण?
पायल गेमिंग हिचं खरं नाव पायल धारे आहे. अत्यंत चांगले गेमप्ले व्हिडीओ आणि लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी ती प्रसिद्ध आहे. भारतीय गेमर्समध्ये तिचा लौकीक आहे. पायलने 2019पासून युट्यूबवरून आपला प्रवास सुरू केला. तिने BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया), PUBG, GTA V आणि इतर गेमप्ले व्हिडीओ तिने पोस्ट केले आहेत. आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ऑगस्ट 2021पर्यंत तिच्या चॅनलला 10 लाख सब्सक्राईबर्स झाले होते. तसेच यूट्यूबवर 30 लाखांचा आकडा पार करणारी ती भारतातील पहिला महिला गेमर बनली आहे.
Leave a Reply