• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध अभिनेत्याने 30 व्या वर्षी संपवलं जीवन, लेकाला अशा अवस्थेत आईने पाहिलं आणि…

December 14, 2025 by admin Leave a Comment


सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्याने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… लेका मृत अवस्थेत पाहिल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी अभिनेत्याच्या वडिलांचा अपघात झालेला आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आधी पतीचा अपघात आणि आता मुलाच्या निधनानंतर आई पूर्णपणे खचली आहे. अभिनेत्यांच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथ याने स्वतःचं आयुष्य स्वतःच संपवलं आहे. वयाच्या 30 व्या वर्षी अखिल याने आत्महत्या केली आहे… अभिनेत्याने 11 डिसेंबर रोजी स्वतःला संपवलं अशी माहिती समोर येत आहे. अखिल याचा मृतदेह केरळ येथील त्याच्या राहत्या घरी आढळला… अखिल विश्वनाथ यांच्या निधनाच्या बातमीने त्याचे जवळचे मित्र आणि चाहते हादरले आहेत आणि ते शोक व्यक्त करत आहेत. चाहते सोशल मीडियावर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

राहत्या घरी आढळला मृतहेद

रिपोर्टनुसार, अखिल विश्वनाथचा मृतदेह केरळमधील त्याच्या घरातून सापडला आहे. अखिलची आई गीता कामावर जाण्याच्या तयारीत असताना तिला   मुलगा घरात मृत अवस्थेत आढळला. त्यानंतर आईला मुलाचा मृतदेह अशा अवस्थेत पाहून मोठा धक्का बसला. अखिलचे वडील चुंकल चेन्चेरीवल्लापिल यांचा तीन महिन्यांपूर्वी रस्ता अपघात झाला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अखिल विश्वनाथ त्याच्या “चोला” या सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आला. सनल कुमार ससिधरन दिग्दर्शित या सिनेमात अखिलने मुख्य भूमिका साकारली होती. हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला एक मल्याळम मानसशास्त्रीय नाट्यमय सिनेमा आहे. या सिनेमाला केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमध्येही पुरस्कार मिळाला.

अखिलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली आणि “मांगंडी” सिनेमातही त्याने काम केलं. “मांगंडी” सिनेमात त्याचा भाऊ अरुण देखील त्याच्यासोबत होता आणि त्यांच्या अभिनयासाठी, दोन्ही भावांना राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार मिळालेला.

मृत्यूचं कारण?

सध्या अखिल विश्वनाथच्या मृत्यूचं कोणतंही ठोस कारण समोर आलेले नाही, परंतु रिपोर्टनुसार, अभिनेत्याने आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह त्याच्या घरात आढळला. अखिलने हे टोकाचे पाऊल का उचललं याचं कोणतेही कारण अद्याप समोर आलेलं नाही. अखिल अभिनेता असला तरी, तो त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी एका मोबाईल फोनच्या दुकानात अर्धावेळ काम करत होता. पण, तो काही दिवसांपासून दुकानात जात नव्हता… अशी माहिती देखील समोर आली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • झहीर इक्बालसोबत लग्न पण त्याआधी अनेकांना सोनाक्षीने केलंय डेट, तिसऱ्या श्रीमंत पुषाला पाहून व्हाल थक्क
  • रात्रीच्या वेळी या 5 सवयी पाळा… डायबिटीज नक्कीच कंट्रोलमध्ये येईल.. तुम्ही यापैकी कोणती सवय पाळता
  • Bigg Boss 19 : ए लेस्बियन चल हट… लैंगिकतेवरून मालती सहन करतेय नको त्या गोष्टी
  • Devendra Fadnavis: अब आगे बढ़ चुका हूं मैं…हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे हृदयगीत, शेरोशायरीतून दाखवले व्हिजन
  • Bigg Boss 19 : आता सलमान खानवर जोक मारणार का? हात जोडत प्रणित म्हणाला..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in