
पोळी, भाजी, भात , आमटी आणि चटणी किंवा एखादी कोशिंबीर… प्रत्येक भारतीय घरातील हा रोजचा ठरलेला मेन्यू असतो. कधीमधी त्यात बदल म्हणून वेगळं काही केलं जातं, पण बहुतांश लोकांच्या घरी जेवणात हेच पदार्थ बनतात. त्यातही पोळी-भाजी खाल्ल्याशिवाय अनेकांना पोटच भरल्यासारखं वाटत नाही. सारखी पोळी नको म्हणून काही लोकां कधीकधी भाकीही खातात. तांदळाची, ज्वारीची, नाचणीची, मिक्स पिठांची अशा विविध पद्धतीच्या भाकरीही आपल्याकडे केल्या जातात. प्रत्येक घरानुसार, वेगवेगळ्या पद्धती असतात, पण पोळी किंवा भाकरी आणि भाजी, भात, आमटी हेच मुख्यअन्न असतं.
अनके घरी कित्येक वर्षांपासून गव्हाच्या पिठाच्या पोळ्या किंवा फुलके तयार केले जातात, गरमागरम पोळी, तूप, आणि भाजी खाण्याची मज्जाच वेगळी असते. तर काहीजणं तांदळाची किंवा ज्वारीच्या पिठाची भाकरी खाणं पसंत करतात. त्याचे काही फायदे असल्यामुळे आजकाल ज्वारीची भाकरी खाणं जास्त प्रेफर केलं जातं. पण असं असलं तरी कित्येक वर्षांपासून नियमित खाल्ली जाणारी (गव्हाची) पोळी योग्य की ज्वारीची भाकरी फायदेशीर, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोच. तुम्हालाही असा प्रश्न पडतो का, चला मग जाणून घेऊया की पोळी आणि भाकरी यात सर्वात जास्त फायदेशीर काय आहे…
ज्वारीच्या भाकरीचे फायदे
ग्लूटेन-फ्री – ज्यांना ग्लूटेनची समस्या आहे त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरीचे चांगली आहे.
फायबरने समृद्ध, बाजरी पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. ज्वारीच्या भाकरीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता देखील दूर होते.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स : मधुमेहाच्या रुग्णांसाठी बाजरीची भाकरी खूप फायदेशीर मानली जाते.
ज्वारीच्या भाकरीमध्ये भरपूर फायबर असते, जे पोट बराच वेळ भरलेले ठेवते, भूक कमी करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
ज्वारीच्या भाकरीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम सारखी खनिजे भरपूर असतात.
(गव्हाच्या) पोळीचे फायदे
ऊर्जा प्रदान करण्यास उपयुक्त : गव्हाची ब्रेड शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते.
प्रोटीन आणि बी व्हिटॅमिनचा उत्कृष्ट स्रोत मानली जाते.
पोळी पचायलाही खूप सोपी असते.
सर्वात जास्त फायदेशीर काय ?
एकंदर पाहता ज्वारीची भाकरी ही बहुतेकदा एकूण आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानली जाते, विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी आणि पचनाच्या समस्या असलेल्यांसाठी ती फायदेशीर ठरते.
पण जर तुम्हाला ग्लूटेनची समस्या नसेल आणि तुमच्या दैनंदिन ऊर्जेची गरज जास्त असेल तर गव्हाच्या पिठाची पोळी खाणं देखील चांगलं ठरते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply