• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पैसा, नोकरी, प्रेम होत्याचं नव्हतं होईल; पुढचे 53 दिवस 3 राशींसाठी असतील भयानक!

December 11, 2025 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र हा भौतिक सुखे, भावनिक संतुलन आणि समृद्धीचा मुख्य कारक आहे. त्याच्या प्रभावामुळे जीवनात सौंदर्य, कला, प्रेमसंबंध आणि आर्थिक प्रगती येते. विलासी वस्तू, आकर्षक वस्त्रे, दागिने, वाहने आणि घरगुती सुख-सुविधा यांचा संबंध शुक्राशी जोडला जातो. व्यवसायातील यश, सद्भावना आणि आकर्षणशक्तीही शुक्राच्या प्रभावावर अवलंबून असते.

shukra asta

सुख, समृद्धी आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करणारा हा शुक्र ग्रह 11 डिसेंबर 2025 रोजी मावळला आहे. शुक्र मावळण्याच्या खगोलीय घटनेला ज्योतिषशास्त्रात “शुक्र तारा मावळ” म्हणून ओळखले जाते. या पुढचे ५३ दिवस शुक्र ग्रह या अवस्थेत राहील. त्यामुळे याचा नकारात्मक परिणाम राशी चक्रातल्या 3 राशींवर होणार आहे. त्या 3 राशी कोणत्या ते पाहूया.

Libra

शुक्र हा तूळ राशीचा स्वामी असल्याने त्याच्या अस्तामुळे या राशीला सर्वाधिक आव्हाने येतील. मानसिक अशांतता वाढू शकते, प्रेमसंबंधात गैरसमज किंवा अंतर येऊ शकते. खर्च अनियंत्रित वाढतील, प्रिय वस्तू हरवण्याची भीती राहील. वैवाहिक जीवनात किरकोळ कारणांवरून तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ कार्यांत अडथळे येतील. संयम ठेवा, शांतपणे संवाद साधा आणि साधेपणाने वागा, परिस्थिती लवकर सुधारेल.

Scorpio

वृश्चिक राशीला शुक्र अस्ताचा थेट परिणाम नातेसंबंध आणि भागीदारीवर होईल. वैवाहिक जीवनात अस्वस्थता जाणवेल, जोडीदाराशी संवाद बिघडू शकतो. खर्च वाढून बचत कमी होईल. चिंता आणि अनिर्णयामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. प्रेम जीवनात अस्थिरता येऊ शकते. नात्यात कठोर शब्द टाळा. हा काळ आत्मचिंतन आणि संयमाचा आहे.

Capricorn

मकर राशीला घरगुती आणि वैयक्तिक जीवनात गुंतागुंत निर्माण होईल. घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते, जवळच्या व्यक्तींशी मतभेद होतील. प्रेमसंबंधात भावनिक असंतुलन आणि अंतर जाणवेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. कामात मंदी आणि निर्णयक्षमतेत अनिश्चितता येऊ शकते. शांतता, संयम आणि विवेकाने परिस्थिती हाताळा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मेस्सीच्या टूरवर कोट्यवधींचा खर्च पाहून ऑलिम्पिक विजेत्या अभिनव बिंद्राचं टीकास्त्र, म्हणाला…
  • Pune Crime : अत्यंत शांत स्वभाव अन्… खासगी क्लासमध्ये वाद विकोपाला अन् विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
  • टीझर पाहून तुमच्या घरातली सासू-सुनेची जोडी आठवेल; ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ची चर्चा
  • Vastu Shastra : घरात या दिशेला कधीच मौल्यवान वस्तू ठेवू नका, अन्यथा कंगाल झालाच म्हणून समजा
  • Rohit Pawar : गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले पोलिसांत मस्ती जिरवण्याची धमक फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in