
समोर साप दिसला की अनेकजण घाबरतात. सापाच्या अनेक जाती या विषारी असतात. या विषारी सापांनी दंश केल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. याच भीतीपोटी जवळपास प्रत्येकजण सापाला घाबरतो. साप दिसताक्षणी अनेकजण त्याला मारून टाकतात. सापांना मारण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच वातावरणीय बदलांमुळे सापाच्या अनेक प्रजाती नष्ट झालेल्या आहेत.
काही प्रजातींचे अस्तित्वच धोक्याच येण्याच्या मार्गावर आहे. असे असताना जो-तो साप दिसला की त्याला अगोदर मारून टाकण्याचाच प्रयत्न करतो. त्यामुळे जगातले सगळेच साप नष्ट झाले तर काय होणार? याचा कधी विचार केला आहे. सापाचे या पृथ्वीवर विशेष असे महत्त्व आहे. अन्नसाखळीमध्ये साप फार महत्त्वाची भूमिका बजावतो.
सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. कारण साप शेतातील उंदरांना खाऊन टाकतो. यासह साप इतरही काही प्राण्यांची शिकार करतो, यामुळे पृथ्वीची एका प्रकारे मदतच होते. याच पद्धतीने अनेक पक्षी आणि प्राणी सापाला अन्न म्हणून खाऊन टाकतात. पृथ्वीवरील सापच नष्ट झाले तर ही अन्नसाखळी बिघडले परिणामी इतरही अनेक प्राण्यांच्या प्रजातींवर संकट ओढवेल.
वैद्यकीय विज्ञानातही सापाला फार महत्त्व आहे. सापाच्या विषापासून आजघडीला अनेक औषधी तयार केल्या जातात. पृथ्वीवरचे सापच नष्ट झाले तर या औषधी तयार करता येणार नाही. परिणामी काही आजारांवर उपचार करणे कठीण होईल. साप मानवाला अनेक आजार होण्यापासून वाचवतात.
लाईम रोग, हंताव्हायरस, लेप्टोस्पायरोसीस यासारख्या आजारांचे कारण असणाऱ्या जीवांना साप खाऊन टाकतो. त्यामुळे सापच नसतील तर मानवाला हे आजार होण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळेच सापांचे अस्तित्त्व हे मानवासाठी तसेच जीवसृष्टीसाठी फार महत्त्वाचे आहे.




Leave a Reply