
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान जरी विभक्त झाले असले तरी घटस्फोटानंतरही त्यांच्यातील मैत्रीचं नातं कायम आहे. या मैत्रीखातर तर कधी मुलांखातर हे दोघं अनेकदा एकत्र आल्याचं पहायला मिळालं. नुकतीच सुझान खानने तिच्या घरी ख्रिसमस पार्टीचं आयोजन केलं होतं.
या पार्टीला हृतिक त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पोहोचला होता. तर सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसुद्धा पार्टीत उपस्थित होता. एकंदर पाहता हृतिक आणि त्याची गर्लफ्रेंड, सुझान आणि तिचा बॉयफ्रेंड आणि हृतिक-सुझानची दोन्ही मुलं या पार्टीला उपस्थित होती.
सर्वांनी मिळून ख्रिसमस एकत्र साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटो सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. बॉयफ्रेंड अर्सलान आणि हृतिकची गर्लफ्रेंड सबासोबतही तिने यावेळी फोटो काढले. सबा आणि सुझान यांच्यातही चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतंय.
आणखी एका फोटोंमध्ये हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलान एकत्र दिसले. या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. घटस्फोटानंतरही इतकं मोठं मन फक्त यांसारख्या सेलिब्रिटींचंच असू शकतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.
नातं असावं तर असं, घटस्फोटानंतरही कटुता आली नाही..; अशा शब्दांत काहींनी त्यांचं कौतुकसुद्धा केलं आहे. हृतिक आणि सुझान यांचे एकमेकांच्या कुटुंबीयांसोबतही चांगलं नातं असल्याचं पहायला मिळतं.





Leave a Reply