• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुतिन यांच्या दौऱ्यात नेमके कोणते करार होणार ? अमेरिकेला भारत ठेंगा दाखवणार का ?

December 1, 2025 by admin Leave a Comment


Putin visits India: या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारतात दौरा आहे. या दौऱ्यात next-gen चे Su-57 लढाऊ विमाने आणि S-500 मिसाईल डिफेन्स सिस्टीम संदर्भात बोलणी करण्याची भारताची तयारी सुरु आहे. ब्लुमबर्गच्या मते ही सुरुवातीची बोलणी असणार असून कोणतीही मोठी डील होण्याची आशा सध्या नाही. गेल्या काही वर्षात भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही रशिया हा जुना मित्र असल्याने त्याच्या सोबतचे दशकाहून जुने डिफेन्स सहकार्य कायम आहे.

भारताचे रशियावरील अवलंबित्व कमी झाले आहे.तरीही SIPRI च्या रिपोर्टनुसार रशिया साल २०२४ अखेरपर्यंत गेल्या चार वर्षातला भारताचा सर्वात मोठी शस्रास्र पुरवठादार राहिला आहे. भारत हळूहळू अमेरिका आणि युरोपकडे खरेदी वाढवत आहे. पण, तरीही रशिया आजही डिफेन्स सेक्टरमध्ये भारताचा कणा राहिला आहे.

वायुसेनेला हवे जास्त फायटर जेट

भारतीय वायूसेनेजवळ आजही 200 हून अधिक रशियन फायटर जेट आहेत. आणि अनेक S-400 सिस्टीम तैनात आहे. वायू सेनेला नवीन लढाऊ विमानांची गरज आहे. यासाठी Su-57 वर बोलणी महत्वाची मानली जात आहेत. वायूसेनेचे म्हणणे आहे की पायलट रशियन सिस्टीमशी आधीच परिचित आहेत. यासाठी Su-57 ला स्वीकारणे सोपे जाईल. त्याची लांब पल्ल्याची क्षेपणास्रे भारताची ताकद वाढवतील.आणि HAL या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती देखील करु शकते.

S-400 ला उशीर

ANI च्या बातमीनुसार पुतिन आणि मोदी यांच्या बैठकीत भारताचा मुख्य फोकस उशीराने मिळणाऱ्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या डीलिव्हरीवर. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की बैठकीचा उद्देश्य केवळ घोषणा नव्हे तर संरक्षण सहकार्याला मजबूत करण्याचा आहे. रशियाने आश्वासन दिले आहे की उर्वरित S-400 सिस्टीम भारताला 2026–27 आर्थिक वर्षापर्यंत मिळतील. भारत रशियाकडून Su-30 अपग्रेड आणि अन्य संयुक्त प्रोजेक्टचा वेग वाढवण्याची विनंती देखील करणार आहे.

संरक्षणासह व्यापाराचीही चर्चा

कोणताही नवा डिफेन्स करा या दौऱ्यात होण्याची शक्यता कमी असली तरी भारत आणि रशियाची संरक्षण भागीदारी कायम ठेवण्याचा भारताचा इरादा आहे. भारताने म्हटले आहे की तो रशियाशी संरक्षण सहकार्य बंद करणार नाही. आणि अमेरिका आणि रशिया दोन्हीकडून खरेदी सुरु ठेवणार आहे. पुतिन यांचा दौऱ्या दरम्यान येत्या 4–5 भारत आणि रशिया बिझनस फोरम देखील आयोजित केला जाणा आहे. ज्यात साल 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापाराला 100 अब्ज डॉलरवर पोहचवण्यासाठी चर्चा होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
  • वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी गरीबी आणू शकतात; तुमच्याही बाथरूममध्ये आहेत का?
  • झोपेत स्वतःला ‘त्या’ अवस्थेत पाहणे शुभ की अशुभ? भविष्यातील धोक्याचे संकेत देतात असे स्वप्न!
  • IPL 2026 : आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार दोन महिने चालणार, या तारखेपासून सामन्यांना सुरुवात!
  • शिर्डीच्या साई मंदिरात भक्ताने केलं 12 लाखांचे गुप्त दान, फोटो आले समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in