
पुण्यात वाहन अपघाताचे सत्र सुरुच आहे. हिंजवडी येथे एका खाजगी बसच्या अपघातात पाच जण चिरडले गेले असून त्यात दोघा सख्या शाळकरी बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात वाहतूक वर्दळी आणि नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवली जात असल्याने सामान्य पादचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. या अपघातात सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंचा व्यक्त केली जात असतानाच पुन्हा हिंजवडीत खाजगी बसने पाच जणांना चिरडल्याने खळबळ उडाली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply