
पुणे महानगर पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन लढणार की नाही यावरुन अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. या संदर्भात राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे म्हटले आहे. आम्ही त्यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले होते. परंतू सुप्रियाताई यांनी त्यांचा गट तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुण्यात युती होणार नसल्याचे अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पुण्याची मानसिकता घड्याळ चिन्हावर कायम असल्याने घड्याळ चिन्हांवर लढण्याचा विचार पुढे आला असावा असे राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे. प्राप्त परिस्थिती योग्य निर्णय काय हे अजित पवार घेतील असेही सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Leave a Reply